रोक्साना
रोक्साना किंवा रोक्सेन (इ.स.पू. ३४३ सालापूर्वी - इ.स.पू. ३१०) ही बॅक्ट्रियाच्या राजकुळात जन्मलेली राजकन्या व मॅसिडोनियाचा सम्राट महान अलेक्झांडर याची पत्नी होती. अलेक्स्झांडरापासून हिला चौथा अलेक्झांडर या नावाने पुढे ओळखला गेलेला पुत्र झाला. महान अलेक्स्झांडराच्या मृत्यूनंतर साम्राज्याच्या उत्तराधिकारीपदासाठी उद्भवलेल्या सत्तास्पर्धेत हिचा पुत्रासहित कपटाने खून केला गेला.
बाह्य दुवे
- लिव्हियस.कॉम - रोक्साना (इंग्लिश मजकूर)