Jump to content

रॉयल स्कूल ऑफ नीडलवर्क

रॉयल स्कूल ऑफ नीडलवर्क (आरएसएन) युनायटेड किंग्डममधील हाताने करायचे भरतकाम शिकवणारी शाळा आहे, १८७२ मध्ये स्थापन झालेली ही संस्था आणि १९८७ पासून लंडन महानगरातील हॅम्पटन कोर्ट पॅलेस या इमारतीत स्थित आहे.

इतिहास

या संस्थेची स्थापना लेडी व्हिक्टोरिया वेल्बी यांनी १८७२ साली केली. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हीची तिसरी मुलगी आणि पाचवे अपत्य राजकुमारी क्रिस्चियन तथा हेलेना ही या संस्थेची पहिली अध्यक्षा होती.