Jump to content

रैला ओडिंगा

रैला अमोलो ओडिंगा
[[चित्र:जागतिक आर्थिक परिषदेत ओडिंगा|रैला ओडिंगा]]

केन्याचे पंतप्रधान
कार्यकाळ
१७ एप्रिल, इ.स. २००८ – ९ एप्रिल, इ.स. २०१३
राष्ट्रपती म्वाई किबाकी

जन्म ७ जानेवारी, इ.स. १९४५
मासेनो, केन्या
राष्ट्रीयत्व केन्या
पत्नी आयडा ओडिंगा
अपत्ये फिडेल कास्ट्रो ओढिआंबो, रोझमेरी, धाकटा रैला, विनी
निवास नैरोबी, केन्या
गुरुकुल लीपझीग विद्यापीठ, माग्डेबर्ग विद्यापीठ
व्यवसाय यांत्रिक अभियांत्रिकी
धर्म ख्रिश्चन

रैला अमोलो ओडिंगा (७ जानेवारी, इ.स. १९४५ - ) हा केन्याचा भूतपूर्व पंतप्रधान आहे. हा पहिल्यांदा केन्याच्या संसदेत १९९२ च्या निवडणुकीत लंगाटाचा खासदार म्हणून निवडून गेला. हा २००१-२००२ दरम्यान केन्याचा उर्जामंत्री तर २००३-२००५ दरम्यान तेथील रस्ते, जाहीर बांधकाम आणि घरकुलमंत्री होता. २००७ च्या अध्यक्षीय निवडणुकीत हा विरोधी पक्षांकडून उमेदवार होता. निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात दंगेधोपे व जाळपोळ झाल्यानंतर ओडिंगाने पंतप्रधान ग्रहण केले. याला अग्वांबो (गूढ माणूस), टिंगा, बाबा, राव आणि जाकोम या नावांनीही ओळखले जाते.