रेहमान मलिक
रेहमान मलिक ( उर्दू: رحمٰن ملک ) ( जन्म १२ डिसेंबर १०५१) हे पाकिस्तानी राजकारणी आहेत. ते पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे अंतर्गत सुरक्षाविषयक सल्लागार आहेत. तत्पूर्वी ते पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री होते.
दुहेरी नागरिकत्वासंदर्भातील ही सुनावणी दरम्यान ब्रिटनचे नागरिकत्व रद्द केल्याचा पुरावा देण्यात अपयश आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांचे संसद सदस्यत्व चार जून २०१२ रोजी रद्द केले. सदस्यत्व रद्द झाले तेव्हा मलिक अंतर्गत सुरक्षामंत्री होते. त्यानंतर त्यांची सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली.