रेह उत्सव
रेह उत्सव हा भारत देशाच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील महत्वाचा उत्सव आहे.[१]इदू मिश्मी जनजातीमध्ये या उत्सवाचे विशेष नियोजन केले जाते.[२]नान्यी इनिताया नावाच्या देवतेची आपण सारी मुले आहोत अशी त्यांची श्रद्धा आहे. या देवतेची कृपादृष्टी रहावी आणि सर्वांमध्ये बंधुभाव आणि आत्मीयता वाढीला लागावी म्हणून या उत्सवाचे प्रयोजन मानले जाते.[३]
कालावधी
दिबांग नदीच्या खोऱ्यात स्थित मिश्मी सदस्य हा उत्सव जून ते ऑगस्ट या कालावधीत साजरा करतात तर अन्य ठिकाणी तो फेब्रुवारी महिन्याच्या आसपास साजरा होतो.[४]
स्वरूप
हा उत्सव खर्चिक आहे असे मानले जाते. या उत्सवात देवीसाठी मोठ्या प्रमाणावर मिथुन या प्राण्याचा बळी दिला जातो तसेच वराह (डुक्कर) हा प्राणीही देवीला बळी म्हणून अर्पण केला जातो. उत्सवाला निमंत्रित केलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे, त्याना मेजवानी देणे यासाठी खर्च केला जातो त्यामुळे प्रत्यक्ष या उत्सवाचे आयोजन करण्याच्या आधी चार ते पाच वर्षे याचे नियोजन सुरू होते.[५] या उत्सवाच्या शेवटी पुरोहित व्यक्तीने केलेले नृत्य याचे आकर्षण मानले जाते. हे नृत्य आध्यात्मिक पातळीचा आविष्कार मानले जाते.[६]
उत्सव
रेह हा सामान्यतः सहा दिवस चालणारा उत्सव आहे.[७] १ ते ३ फेब्रुवारी या काळात तो संपन्न होतो. पहिल्या दिवसाला अन्द्रोप असे संबोधिले जाते.या दिवशी उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी देवतेला प्रार्थना केली जाते. घराजवळ मिथुन नावाचा प्राणी आणून बांधला जातो. नाया नावाचे विशिष्ट नृत्य रात्रीच्या वेळी केले जाते. एयनाली हा दुसरा दिवस असतो ज्यामध्ये विविध प्राण्यांचा बळी दिला जातो. आलेल्या पाहुण्याना भात, माणसाचे पदार्थ आणि मद्य दिले जाते. तिसरा दिवस इयीली नावाने ओळखतात. या दिवशी शाही मेजवानी दिली जाते.ज्याना या उत्सवाला उपस्थित राहता आलेले नाही अशा शेजारच्या वस्तीतील अथवा गावातील लोकांसाठी भोजन पाठविले जाते.[८] इलीरोमूनयी या चौथ्या दिवशी काही नियोजन नसते. केवळ पुरोहित सदस्य जमातीतील सर्व लोकांसाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. या दिवशी यु नावाचे मद्य एका डुकराच्या कानात ओतले जाते आणि त्या डुकराला हात पाय बांधून जमिनीवर पालथे पाडले जाते. डुकराने विरोध केला तर ते शुभ मानतात आणि जर ते स्वस्थ पडून राहिले तर तो अशुभ संकेत मनाला जातो.[४] पाचव्या दिवसाला अरु- गो म्हणले जाते. या दिवशी पुन्हा सर्व शेजारी गावकरी सदस्यांसह मेजवानी केली जाते. एतोअनु नावाचा दिवस हा सहावा आणि शेवटचा दिवस मनाला जातो. या दिवशी रक्ताचे डाग असलेले बियाणे जमिनीत पेरले जाते आणि त्यावर तांदळाचे मद्य शिंपडले जाते. झाडाच्या बुंध्याकडील भाग घराच्या शेजारी जमिनीत पुरला जातो.[८]
संदर्भ
- ^ Sadangi, H. C. (2008-11). Emergent North-East : A Way Forward (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 978-81-8205-437-0.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Sadangi, H. C. (2008-11). Emergent North-East : A Way Forward (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 978-81-8205-437-0.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "Arunachal: Guv, CM convey Reh Festival greetings" (इंग्रजी भाषेत). 2022-05-26 रोजी पाहिले.
- ^ a b Desk, Sentinel Digital (2021-02-01). "Reh, the Festival of Idu Mishmis Celebrated in Arunachal Pradesh - Sentinelassam". www.sentinelassam.com (इंग्रजी भाषेत). 2022-05-26 रोजी पाहिले.
- ^ Gajrani, S. (2004). History, Religion and Culture of India (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 978-81-8205-065-5.
- ^ Bezbaruah, Madan Prasad (2003). Fairs and Festivals of India: Bihar, Jharkhand, Orissa, West Bengal, Arunachal Pradesh, Assam, Manipur, Meghalaya, Mizoram, Nagaland, Sikkim, Tripura (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 978-81-212-0812-3.
- ^ "Of Reh, Rituals and Rice Beer". https://www.outlookindia.com/outlooktraveller/ (इंग्रजी भाषेत). 2022-06-06 रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य) - ^ a b "REH- The Festival of Idu Mishmis | Arunachal24" (इंग्रजी भाषेत). 2017-01-31. 2022-05-26 रोजी पाहिले.