Jump to content

रेसिपी

डाळीचे लाडू

साहित्य :-

१ किलो हरभरा डाळीचे पिठ

चवीनुसार मीठ

१ किलो साखर

आर्धी वाटी काजूचे तुकडे

आर्धी वाटी बदामाचे तुकडे

१ वाटी तूप

कृती :-

हरभरा डाळीचे लाडू करण्यासाठी प्रथम एक किलो डाळीचे पिठ घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ घालावे. यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पिठ मलुन घ्या.त्यानंतर एका कडई मध्ये तेल गरम करून शेव तयार करून घ्यावी.नंतर एका पातेल्यात एक किलो साखर घेऊन त्यात दोन वाटी पाणी घालून मंद गस वर पाक तयार होईपर्यंत हालवणे. त्यानंतर त्यात शेव टाकावी .काजुचे तुकडे टाकावे.बदामाचे तुकडे टाकावे.सगळे मिश्रण एकत्र करून त्यात एक वाटी तूप टाकावे .आवडीनुसार लहान लहान गोल लाडू बांधून घावेत.