रेसिडेन्सी टॉवर्स (चेन्नई)
प्रस्तावना
रेसिडंसी टॉवर्स,चेन्नई हे फोर स्टार आरामदाई हॉटेल आहे. हे भारत देशाचे चेन्नई येथिल टी.नगर येथे आहे. याचा बांधकाम खर्च ५०० मिल्लियन आहे. हे हॉटेल म्हणजे या शहरातील दोन क्रमांकाचे रेसिडेंसी हॉटेल आणि चार क्रमांकाचे चेन मधील हॉटेल आहे.[१]
इतिहास
सूद आणि सूद हे आप्पास्वामी ग्रुप मध्ये रशियन कॉन्सुलेट कडून २६ ग्राऊंड जमीन ताब्यात घेतल्यानंतर तेथे व्यापारी केंद्र विकशीत करण्यासाठी एकत्र आले. पण पुन्हा त्यांनी तो विचार बाजूला ठेवून तेथे फोर स्टार हॉटेल बांधण्याचा निर्णय घेतला.[२]
हॉटेल
हे हॉटेल २६ ग्राऊंड जमिनीवर बांधले. या हॉटेलचे १६ मजले आहेत. त्यात १७६ खोल्या, ११ पायाभूत सूट, रेस्टारंट्स, सभा ग्रह, वाहन तळ सुविधा, व्यवसाय केंद्र, ६ बकेट हॉल त्यात १०० ते १००० लोक सामाऊ शकतील, दोन एक्झिक्युटिव क्लब मजले, एक सूट मजला, स्वास्थ्य केंद्र, पोहण्याचा तलाव, स्पा, इ.बाबी आहेत.[३] जून २००३ मध्ये या होटलच्या दक्षिण बाजूचे दक्षिण आरोमास मध्ये केळीच्या पानावर स्पेशल आहार देण्याचे सुरू केले आहे.
रूम सुविधा
सर्व खोल्या सुंदर पद्दतीने सजविलेल्या, सर्व सुविधां असणाऱ्या आहेत की ज्या तरुणांना भावतात. सर्व सुविधायुक्त म्हणजेच क्लब रूम्स, डिलक्स रूम्स, सूट रूम्स, आदर्श रूम्स आहेत. सर्व खोल्यातून कॉफी आणि चहा बनविण्याची सोय आहे. फ्लॅट स्क्रीन टी.व्ही., टेलिफोन, Wi-Fi सुविधा, टेबल लॅम्पं, हेयर ड्रायर, टेंप, कंट्रोल, डायरेक्ट डायलिंग, लिखाण मेज, इ. सुविधा आहेत.[४] आवारातील सुविधामध्ये किड्स पूल, जिम, स्पा, ब्युटी सलून, पोहण्याचा तलाव, २४ तास स्वागत कक्ष, प्रवासी टेबल, वाहन तळं, सभाग्रह सुविधा, मोफत दैनिक, व्यवसाय सेवा इ. सुविधा आहेत.
खान पान व्यवस्था
मेन स्ट्रीट रेस्टारंट, रुफ टॉप रेस्टारंट, बाइक आणि बॅरल मध्ये पब, अरोमा, या ठिकाणी दाक्षिन्यात्य, उत्तर भारतीय, महाराष्ट्रीय,आणि आंतरराष्ट्रीय सर्व प्रकारचे पदार्थ आणि मदीरा यांची सुविधा आहे.[५] कोस्टल फूड ही उपलब्ध आहे.