रेवाडी
?रेवाडी हरियाणा • भारत | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची | • २४५ मी |
जिल्हा | रेवाडी |
तालुका/के | रेवाडी तालुका |
लोकसंख्या • घनता | १,४०,८६४ (2011) • ४८३/किमी२ |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • 123401 • +त्रुटि: "+91-1274" अयोग्य अंक आहे • HR |
रेवाडी भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे. हे शहर रेवाडी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
भूगोल
रेवाडीचे अक्षांश २८.१८° उत्तर आणि रेखांश ७६.६२° पूर्व असे आहेत. ते समुद्रसपाटीपासून २४५ मी. (८०३ फूट) उंचीवर वसले आहे.
इतिहास
सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य (इ.स. १५०१–इ.स. १५५६) त्यांचे शिक्षण रेवाडीमध्ये झाले. रेवाडी त्यांची कर्मभूमी होती. ७ ऑक्टोबर, इ.स. १५५६ ते ५ नोव्हेंबर, इ.स. २५५६ या कालखंडात ते दिल्लीच्या सिंहासनाचे अधिपती होते. मुघल सम्राट/बादशहा अकबराने त्याला हरवून मुघल साम्राज्याच्या विस्तारास मार्ग मोकळा केला.
रेवाडीचा शासक राव तुलाराम (इ.स. १८२५ – इ.स. १८६३) याने ब्रिटिश वसाहतवादाविरोधातल्या इ.स. १८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्ययुद्धात सहभागी होऊन लढा दिला.
वाहतूक व्यवस्था
हवाई वाहतूक
दिल्ली विमानतळ येथून सर्वांत जवळचा विमानतळ आहे.
रेल्वे वाहतूक
हे शहर एक महत्त्वाची रेल्वे स्थानक आहे. रेवाडी स्थानकावर सर्व रेल्वेगाड्या थांबतात. रेवाडी शहर भारताच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी रेल्वे चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे.
रस्ते वाहतूक
राष्ट्रीय महामार्ग क्र. ८, ७१ व ८१ब यांवर हे शहर पडते. शासकीय व खाजगी बससेवा रेवाडीला दिल्ली, हरियाणाच्या, पंजाबच्या व राजस्थानच्या शहरांशी जोडतात. हरियाणा राज्य परिवहन मंडळाचे बससेवा रेवाडीला हरियाणाच्या अन्य शहरांशी व ग्रामीण भागाशी जोडते.
रेवाडी व दिल्ली दोन्ही शहरांदरम्यान केवळ दोन तासांचे अंतर (८१ किमी) आहे.
हवामान
रेवाडीचे वार्षिक पर्जन्यमान 553 मिलिमीटर इतके आहे. वर्षभरातील तापमान 3°-46° सेल्सियस या पल्ल्यात राहते. मोसमी पावसानंतर नोव्हेंबर महिन्यात रात्री थंड असतात. हिवाळा हा ऋतू नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यांपर्यंत असतो. या काळात रात्रीचे तापमान 3° सेल्सियसांच्या खाली असते.
अर्थव्यवस्था
शिक्षण
केंद्रीय विद्यालय (सीबीएसई), इतर अनेक शासकीय व खाजगी शाळा, आय.टी.आय., (अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विधि, कॉमर्स, सामाजिक शास्त्रे व इतर अनेक) महाविद्यालय, वणस्पती संशोधन केंद्र इत्यादी शैक्षणिक संस्था येथे आहेत.
बाह्य सूत्र
- रेवाडी आधिकारिक पृष्ठ। Archived 2007-07-03 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील रेवाडी पर्यटन गाईड (इंग्रजी)