रेल्वे गेज
आकारमानानुसार | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
रेल्वे वाहतूकीसाठी वापरल्या जाणाऱ्या लोहमार्गावरील दोन रूळांमधील अंतराला रेल्वे गेज किंवा लोहमार्ग मापी असे म्हणतात. जगभरात अनेक रेल्वे गेज अस्तित्वात आहेत. भारत देशामध्ये रेल्वे वाहतूकीच्या सुरुवातीपासून प्रामुख्याने नॅरो गेज, मीटर गेज व ब्रॉड गेज हे तीन अस्तित्वात होते. आजच्या घडीला भारतीय रेल्वे प्रामुख्याने ब्रॉड गेजवर धावते. परंतु जगभरातील अंदाजे ५४ टक्के रेल्वे वाहतूक प्रमाण गेज वापरून केली जाते. तसेच बव्हंशी द्रुतगती रेल्वेमार्ग प्रमाण गेज वापरतात.
जगातील प्रमुख गेज

५९७ मिमी, ६०० मिमी, ६०३ मिमी, ६१० मिमी (२ फूट) (नॅरो गेज)
७५० मिमी, ७६० मिमी बोस्नियन, ७६२ मिमी (२ फूट ६ इंच), ८०० मिमी
८९१ मिमी स्वीडिश, ९०० मिमी, ९१४ मिमी (३ फूट)
१,००० मिमी (मीटर गेज)
१०६७ मिमी (३ फूट ६ इंच)
१३७२ मिमी (४ फूट ६ इंच)
१४३५ मिमी (प्रमाण गेज)
१५२० मिमी रशियन गेज
१५२४ मिमी जुना रशियन गेज (५ फूट)
१६०० मिमी (५ फूट ३ इंच)
१६६८ मिमी आयबेरियन
१६७६ मिमी (५ फूट ६ इंच) (ब्रॉड गेज)
१८२९ मिमी (६ फूट), २१४० मिमी ब्रुनेल