रेबेल विल्सन
Australian actress, writer, producer | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
स्थानिक भाषेतील नाव | Rebel Melanie Elizabeth Wilson |
---|---|
जन्म तारीख | मार्च २, इ.स. १९८० सिडनी Melanie Elizabeth Bownds |
कार्य कालावधी (प्रारंभ) |
|
नागरिकत्व | |
निवासस्थान |
|
शिक्षण घेतलेली संस्था |
|
व्यवसाय |
|
मातृभाषा |
|
सहचर |
|
उल्लेखनीय कार्य |
|
पुरस्कार |
|
रेबेल मेलानी एलिझाबेथ विल्सन (जन्म मेलानी एलिझाबेथ बाउंड्स २ मार्च १९८०)[१][२][३][४][५] एक ऑस्ट्रेलियन अभिनेत्री, विनोदकार, लेखक, गायिका आणि निर्माता आहे. २००३ मध्ये ऑस्ट्रेलियन थिएटर फॉर यंग पीपलमधून पदवी घेतल्यानंतर, विल्सनने एसबीएस कॉमेडी मालिका पिझ्झा (२००३-२००७) मध्ये टॉलाच्या भुमीकेत काम करण्यास सुरुवात केली आणि नंतर स्केच कॉमेडी शो द वेज (२००६-०७) मध्ये दिसली. तिने बोगन प्राइड (२००८) ही म्युझिकल कॉमेडी मालिका लिहिली, निर्मिती केली आणि त्यात अभिनय केला. युनायटेड स्टेट्समध्ये गेल्यानंतर लवकरच, विल्सन २०११ मध्ये ब्राइड्समेड्स आणि ए फ्यू बेस्ट मेन या कॉमेडी चित्रपटांमध्ये दिसला.
२०१२ मध्ये, विल्सन व्हॉट टू एक्स्पेक्ट व्हेन यू आर एक्स्पेक्टिंग, स्ट्रक बाय लाइटनिंग आणि बॅचलोरेट या कॉमेडी चित्रपटांमध्ये दिसली, ज्यामुळे व्हरायटी मासिकाने तिला "२०१३ ची टॉप टेन कॉमिक्स" असे नाव दिले. तिने म्युझिकल कॉमेडी पिच परफेक्ट मालीकेत (२०१२-२०१७) मध्ये फॅट एमीची भूमिका साकारली, ज्याने तिला अनेक पुरस्कार नामांकन आणि विजय मिळवून दिले, ज्यात सर्वोत्कृष्ट ब्रेकथ्रू परफॉर्मन्ससाठी एमटीव्ही मूव्ही अवॉर्ड आणि चॉइस मूव्ही अभिनेत्रीसाठी टीन चॉइस अवॉर्ड यांचा समावेश आहे. २०१६ मध्ये, ती हाऊ टू बी सिंगल आणि ग्रिम्सबी या चित्रपटांमध्ये दिसली.
विल्सनने सुपर फन नाईट (२०१३) मध्ये लिखाण केले आणि अभिनय देखील केला, जी एक दूरचित्रवाणी सिटकॉम होती जी एबीसी वर प्रसारित झाली. २०१९ मध्ये, तिने इजन्ट इट रोमँटिक यामध्ये पहिल्या मुख्य भूमिकेत काम केले. द हसल (२०१९) मध्ये तिने पेनी रस्टची भूमिका केली आणि ती ॲन हॅथवे सोबत दिसली. कॅट्स (२०१९) मध्ये तिने जेनीएनिडॉट्स म्हणून पात्र सादर केले जे टी.एस. इलियटच्या कवितेवर आधारीत होते. जोजो रॅबिट (२०१९) या ड्रामा चित्रपटात फ्रौलिन रहमच्या भूमिकेसाठी, विल्सनला मोशन पिक्चरमधील कलाकारांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. २०२२ मध्ये, तिने नेटफ्लिक्स कॉमेडी चित्रपट सीनियर इयर मध्ये काम केले, ज्याची ती सह-निर्माता देखील होती.
वैयक्तिक जीवन
रेबेल मेलानी एलिझाबेथ विल्सन यांचा जन्म २ मार्च १९८० रोजी सिडनी, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया येथे झाला.[६] तिचे पालक व्यावसायिकरित्या कुत्रे पाळतात.[७][८][९] तिने १९९७ मध्ये तिने ९९.३ रँकिंग मिळवून, फूड टेक्नॉलॉजीमध्ये राज्यात द्वितीय क्रमांकासह तिचे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पूर्ण केले.[१०][११]
विल्सनला तीन भावंडे आहेत: बहिणी लिबर्टी आणि ॲनालिझ (ज्या "अनार्ची" नाव वापरतात) आणि एक भाऊ, जो "रायट" नाव वापरतो. [८] [१२]
तिने न्यू साउथ वेल्स विद्यापीठात प्रवेश घेतला व २००९ मध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स (थिएटर आणि परफॉर्मन्स स्टडीज) आणि बॅचलर ऑफ लॉ पदवी मिळवली. तिने वकील होण्याची योजना आखली, परंतु अभिनय करण्यासाठी युनायटेड स्टेट्सला गेली.[७][१३]
वैयक्तिक जीवन
जुलै २०१५ मध्ये, विल्सनने अमेरिकन बंदुकी कायद्यांमध्ये कडकपणा आणन्याबाबत पाठिंबा दर्शविला.[१४][१५] [१६] विल्सन ही नॅशनल फुटबॉल लीगच्या लॉस एंजेलिस रॅम्सची चाहती आहे.[१७]
सप्टेंबर २०१२ पासून २०१५ पर्यंत विल्सन आणि तिचा ब्राइड्समेड्सचा सह-कलाकार, ब्रिटिश अभिनेता मॅट लुकास, वेस्ट हॉलीवूडमध्ये एकत्र राहत होते.[१८][१९] नोव्हेंबर २०२२ मध्ये इन्स्टाग्रामवर, तिने सरोगसीद्वारे जन्मलेली तिच्या पहिल्या मुलीच्या जन्माची घोषणा केली.[२०] विल्सनने जून २०२२ मध्ये इंस्टाग्रामवर सार्वजनिकपणे लेस्बियन असल्याचे जाहिर केले.[२१][२२]
तिने २०२० मध्ये ६० पौंड (२७ किलो) कमी करणे हे तिचे ध्येय बनवले आणि नोव्हेंबर २०२० पर्यंत तसे केले. विल्सनने सांगितले की ती कशी दिसते यावर तिला नेहमीच आत्मविश्वास होता, परंतु आता तिला तिचा आत्मविश्वास वाढलेला वाटतो.[२३]
संदर्भ
- ^ Aubusson, Kate (20 May 2015). "Rebel Wilson's birth date revealed in ASIC documents". The Sydney Morning Herald. 5 August 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 May 2015 रोजी पाहिले.
Business records filed with the Australian Securities & Investments Commission (ASIC) list the date of birth for a "Rebel Melanie Elizabeth Wilson" as March 2, 1980
- ^ Miller, Megan (19 November 2011). "The Q&A with actor Rebel Wilson". Herald Sun. 28 July 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 August 2013 रोजी पाहिले.
- ^ In later years she adopted "Rebel"–a childhood nickname –as her first name and changed her surname to Wilson. She retained her first two given names as middle names.
- ^ Fowler, Tara (20 May 2015). "Facts vs. Fibs: Rebel Wilson's Real Age is 35, Records Confirm". People. 20 May 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 May 2015 रोजी पाहिले.
The Australian Electoral Roll lists her real name as Melanie Elizabeth Bownds, though she later changed her last name to Wilson, as has been previously reported. Last year, however, she told The Australian Women's Weekly that her real name was in fact Rebel, and that Melanie and Elizabeth were middle names she went by at school to avoid being teased.
- ^ Jimmy Kimmel Live (26 April 2022). "Rebel Wilson on Being Cheeky in High School, Working in a Movie Theater & Playing Handbells" (इंग्रजी भाषेत). 8 August 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 August 2022 रोजी पाहिले – YouTube द्वारे.
(Yearbook Photograph Page) Rebel talks about visiting family back in Australia, working in a movie theater when she first came to Hollywood, going to an all-girls Christian high school, masterminding escapes to visit the neighboring boys school, her prom being a disaster, her new movie Senior Year on Netflix, and she plays handbells to the tune of Happy Birthday for Melania Trump’s 52nd.
- ^ "Rebel Wilson". Biography.com. 9 March 2021. 22 June 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 March 2016 रोजी पाहिले.
- ^ a b "Rebel Wilson: 10 things you might not know about the Hollywood comedy queen". ABC News (Australia). 9 February 2016. 10 June 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 July 2022 रोजी पाहिले.
- ^ a b Field, Melissa (6 November 2011). "Winning Laughs and Losing Weight". The Daily Telegraph. 18 July 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 January 2013 रोजी पाहिले.
- ^ "Don't be mocking the moccasins". The Age. 17 June 2008. 1 April 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 December 2013 रोजी पाहिले.
- ^ "Food Technology 2 unit". Board of Studies. 9 August 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 May 2015 रोजी पाहिले.
- ^ "10 things you might not know about Rebel Wilson" (इंग्रजी भाषेत). Australian Broadcasting Corporation. 9 February 2016. 1 August 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 June 2021 रोजी पाहिले.
- ^ "Rebel Wilson's siblings argue family has tradition of 'unusual' names at trial". The Guardian. Australian Associated Press. 1 June 2017. 12 June 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 June 2018 रोजी पाहिले.
- ^ "Leaders". University of New South Wales. 18 May 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 May 2015 रोजी पाहिले.
- ^ Derschowitz, Jessica (25 July 2015). "Rebel Wilson says America needs new gun laws after Lafayette theater shooting". Entertainment Weekly. 27 July 2015 रोजी पाहिले.
- ^ "Rebel Wilson condemns US gun laws". Sky News Australia. 26 July 2015. 16 August 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 July 2015 रोजी पाहिले.
- ^ Noyes, Jenny (25 July 2015). "Rebel Wilson speaks out about gun control after 'Trainwreck' shooting in Louisiana". Daily Life. 14 September 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 July 2015 रोजी पाहिले.
- ^ "Rebel Wilson on Her Newest Role: L.A. Rams Super Fan". The Hollywood Reporter. 28 April 2021. 18 January 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 January 2023 रोजी पाहिले.
- ^ Wightman, Catriona (3 September 2012). "'Bridesmaids' Rebel Wilson, Matt Lucas live together, annoy neighbours". Digital Spy. 10 July 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 January 2013 रोजी पाहिले.
- ^ "Matt Lucas on Rebel Wilson moving out and being the boss". BBC News. 29 September 2015. 16 May 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 February 2016 रोजी पाहिले.
- ^ Slater, Georgia (7 November 2022). "Rebel Wilson Welcomes First Baby, Daughter Royce Lillian: 'Beautiful Miracle'". People. 7 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 November 2022 रोजी पाहिले.
- ^ VanHoose, Benjamin; McNeil, Liz (9 June 2022). "Rebel Wilson Reveals the New Love in Her Life: I Found My 'Disney Princess'". People. 9 June 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 June 2022 रोजी पाहिले.
- ^ Wilson, Rebel (19 February 2023). "We said YES! #engaged". 21 February 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 February 2023 रोजी पाहिले – Twitter द्वारे.
- ^ Nied, Jennifer (1 June 2021). "Rebel Wilson's 'Year Of Health' May Be Over, But She Looks Better Than Ever". Women's Health (इंग्रजी भाषेत). 9 June 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 June 2021 रोजी पाहिले.