रेने बोर्जेस
रेने मारिया बोर्जेस (Renee Borges) (२५ फेब्रुवारी, इ.स. १९५९ - ) या एक मराठी शास्त्रज्ञ आहेत. बंगलोरमधील भारतीय विज्ञान संस्थेतील पर्यावरण शास्त्राभ्यास अध्यासनाच्या त्या प्राध्यापक-अधीक्षक आहेत.[१] ज्येष्ठ पर्यावरणवादी तथा वास्तुविशारद उल्हास राणे यांच्या त्या पत्नी आहेत.[२]
शिक्षण
रेने बोर्जेस यांनी मुंबईच्या सेंट झेव्हियर्स कॉलेजमधून बारावी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्या मुंबईतील भारतीय विज्ञान संस्थेत दाखल झाल्या प्राणिशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र हे विषय घेऊन त्या बी.एस्सी. आणि नंतर प्राणि-शरीरशास्त्र या विषयात एम.एस्सी. झाल्या. पुढे मायामी विद्यापीठातून त्यांनी शेकरू या प्राण्याच्या वैविध्यावर प्रबंध लिहून पीएच्डी मिळवली.[३]
भीमाशंकरी शेकरू वरील संशोधन
१९८५ च्या आसपास रेने बोर्जेस यांनी आपल्या संशोधनाची सुरुवातीची पाच वर्षे भीमाशंकरच्या अभयारण्यात व्यतीत केली होती. पीएच.डी.साठी निवडलेला प्रकल्प हा शेकरू (जायंट स्क्विरल) होता. त्यासाठी त्यांनी भारतात गोव्यातील नागोड आणि महाराष्ट्रातील भीमाशंकर या दोन ठिकाणांची निवड केली. या दोन्ही जंगलांमध्ये त्या एक एक वर्ष तळ ठोकून होत्या. त्यांच्या पीएच.डी.च्या अभ्यासाच्या काळातच भीमाशंकर अभयारण्य घोषित होण्याच्या हालचाली सुरू होत्या. ज्या शेकरूमुळे या अभयारण्याचे नाव गाजत होते, त्या शेकरूच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना असणे गरजेचे होते. त्या वेळी रेने बोर्जेस यांनी पुढील पाच वर्षे भीमाशंकरचं जंगल पिंजून काढले. शेकरूचे अधिवास, त्याला लागणारं खाद्य पुरवणाऱ्या वनस्पती आणि त्या अनुषंगाने एकूणच भीमाशंकरची जैवविविधता याच्या र्सवकष नोंदी त्यांच्या अभ्यासातून झाल्या. आजही त्यांच्या अभ्यासाचा आधार भीमाशंकरच्या संवर्धनासाठी महत्त्वाचा मानला जातो.[४]
त्यानंतरच्या काळात रेने बोर्जेस यांनी बंगलोरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस येथे संवर्धन संशोधन शाखेत काम केले. नंतरच्या काळात पर्यावरणाशी निगडित अनेक संशोधन संस्था, भारत सरकारची पर्यावरण सल्लागार समिती अशी अनेक महत्त्वाच्या पदांवर कामे केली आहेत. २०१०-११ सालच्या पश्चिम घाटासाठी माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या विशेष समितीमध्ये रेने बोर्जेस या एकमेव स्त्री-सदस्य होत्या.[५][६]
मानसन्मान
- रेनी बोर्जेस या गोवा येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था चालविणाऱ्या भारतीय विज्ञान अकादमीच्या संचालक मंडळाच्या सभासद आहेत.
- पश्चिम घाट पर्यावरण संरक्षणासाठी स्थापन झालेल्या तज्ज्ञमंडळाच्या त्या सदस्या आहेत.
- बंगलोरमधील भारतीय विज्ञान अकदमीच्या त्या अधिछात्र (फेलो) होत्या..
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Renee M. Borges". ces.iisc.ernet.in (इंग्रजी भाषेत). 2018-12-13 रोजी पाहिले.
- ^ "ज्येष्ठ पर्यावरणवादी उल्हास राणे यांचे निधन". लोकसत्ता. 2022-06-03 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २४ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ May 7, Chitra SubramanyamBushra Ahmed; May 19, 2008 ISSUE DATE:; May 10, 2008UPDATED:; Ist, 2008 12:34. "Chalk it up". India Today (इंग्रजी भाषेत). 2018-12-13 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ Borges, Renee (1989-01-01). "Resource heterogeneity and the foraging ecology of the Malabar giant squirrel Ratufa indica". Dissertations from ProQuest.
- ^ "Integrated study needed for Ghats". frontline.thehindu.com/ (इंग्रजी भाषेत). 2021-04-11 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ Saberwal, Vasant K.; Rangarajan, Mahesh (2005). Battles Over Nature: Science and the Politics of Conservation (इंग्रजी भाषेत). Orient Blackswan. ISBN 9788178241418.