Jump to content

रेणू दांडेकर

सौ. रेणू राजाराम दांडेकर या एक मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेविका आहेत. रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील चिखलगाव नावाच्या गावात रेणू दांडेकर आणि त्यांचे पती राजाभाऊ दांडेकर हे अनेक वर्षे कौशल्यपूर्ण, प्रकल्पाधारित शिक्षणातून उत्तम विद्यार्थी घडवीत आले आहेत.

ग्रामविकासाचे स्वप्न घेऊन १९८२ साली एक तरुण जोडपं कोकणातील चिखलगाव सारख्या दुर्गम भागात आलं. ग्रामविकासाचा पाया म्हणून  शाळा सुरू केली. “कौशल्याधारित  शिक्षण ” हा जगणं समर्थ करणारा विचार घेऊन चिखलगाव आणि आजूबाजूच्या ४६ गावांमध्ये लोकसाधना काम करत आहे. शिक्षण, आरोग्य , शेती, मिहला सबलीकरण आणि सर्वांगीण  ग्रामविकास या पाच क्षेत्रात लोकसाधना आज काम करत आहे.

डॉ. मुरलीधर गोडे आणि श्री.वा. नेर्लेकर यांनी संपादित केलेल्या 'आजचा श्याम घडताना' या पुस्तकात अच्युत गोडबोले, डॉ. विकास आमटे आदींबरोबर रेणू दांडेकर यांचेही लेखन आहे.

रेणू दांडेकर या दैनिक लोकसत्तामध्ये अनोख्या शाळांचा परिचय करून देणारी 'सृजनाच्या नव्या वाटा' नावाची साप्ताहिक लेखमाला लिहितात.

रेणू दांडेकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • अ.. अ.. अभ्यासाचा
  • ८०० शालेय प्रकल्प
  • ...आता शाळेत जायचं
  • कणवू : सृजनशील शिक्षणाचे स्वप्न
  • डॉ. कलाम यांची दशसूत्री
  • खेळातून भाषाविकास
  • खेळातून विज्ञान
  • नवी पालकनीती
  • निर्मितीच आकाश
  • पालकत्वाच्या नव्या वाटेवर
  • बालकेंद्री शिक्षण नवे आकाश (अनेक भाग?)
  • मी शाळा बोलतेय
  • मुलं घडताना - घडविताना...
  • मुलांशी बोलताना...
  • रुजवा
  • लिहू या आनंदे
  • शिकू या आनंदे
  • शिक्षणातील चांगले काही
  • शोध मुलांच्या मनाचा (लेखन - रेणू दांडेकर; अन्य संपादक - डाॅ पुरुषोत्तम भापकर, डाॅ. मीनल नरवणे आणि डाॅ. शशिकांत वायदंडे)
  • संवाद तरुणाईशी  : तरुण पिढीच्या पालकत्वाविषयी

पुरस्कार

  • रेणू दांडेकर यांना त्याच्या शिक्षणविषयक कार्याबद्दल मानाचा बाया कर्वे पुरस्कार मिळाला आहे.
  • 'तुम्ही-आम्ही पालक' मासिकाच्या वर्धापदिनानिमित्त डीपर व सर फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा २०१७ सालचा 'महापालक सन्मान'.
  • कोसबाडच्या नूतन बाल शिक्षण संघातर्फे दिला जाणारा पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार.