रेडिंग रेल्वे स्थानक
रेडिंग रेल्वे स्थानक हे इंग्लंडच्या रेडिंग शहरातील मुख्य रेल्वे स्थानक आहेत. हे लंडन पॅडिंग्टन रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस ५८ किमी (३६ मैल) अंतरावर असून रेडिंग शहराच्या मध्यवर्ती भागाच्या उत्तरेस थेम्स नदीच्या उत्तर काठावर आहे.
रेडिंग हे लंडन महानगराबाहेरचे ग्रेट ब्रिटनमधील नववे-व्यस्त स्थानक आणि लंडनबाहेर दुसरे सर्वात व्यस्त इंटरचेंज स्थानक आहे . [१]
नेटवर्क रेल या स्थानकाचे व्यवस्थापन करते. येथे ग्रेट वेस्टर्न रेल्वे, क्रॉसकंट्री, साउथ वेस्टर्न रेल्वे आणि एलिझाबेथ लाइन या चार कंपन्या रेल्वे सेवा पुरवतात . [२]
रेडिंग रेल्वे स्थानकाचे उद्घाटन ३० मार्च, १८४० रोजी झाले. त्यावेळे ही ग्रेट वेस्टर्न रेल्वे (जीडब्ल्यूआर)च्या मुख्य मार्गावरील पश्चिमेकडील शेवटचे स्थानक होते. त्या वेळी लंडन ते रेडिंग प्रवास करण्यासाठी एक तास पाच मिनिटात होऊ लागला. ही वेळ त्याकाळच्या सर्वात वेगवान स्टेजकोचच्या एक चतुर्थांशपेक्षा कमी होता.[३]
टी.ई लॉरेन्स (लॉरेन्स ऑफ अरेबिया) १९१९मध्ये या स्थानकातून जात असताना त्यांची ब्रीफकेस आणि त्यातील सेव्हेन पिलर्स ऑफ विझ्डम या पुस्तकाचा २,५०,००० शब्दांचा पहिला मसुदा येथे राहिला आणि हरवला. हा मसुदा लिहून झाल्याने लॉरेन्स यांनी आपल्या नोंदी टाकून दिल्या होत्या. त्यानंतर लॉरेन्स यांनी संपूर्ण मसुदा आठवून आठवून पुन्हा लिहन काढला. तीन महिन्यांनी दुसरा मसुदा ४,००,००० शब्दांचा त्यांनी प्रकाशकास पाठवला.
- | मुख्य मार्ग (ब्रिस्टल-पॅडिंग्टन) | ||
- | वेस्टबरी मार्ग | - | मालवाहतूक |
- | राखीव मार्ग | - | इतर मार्ग |
संदर्भ
- ^ "Estimates of station usage | ORR Data Portal". dataportal.orr.gov.uk. 24 November 2022. 26 Oct 2023 रोजी पाहिले.
- ^ "Reading; a major transport hub". Network Rail. 2023. 21 October 2023 रोजी पाहिले.
- ^ Christiansen, Rex (1981). Thames And Severn. Newton Abbot: David and Charles. p. 20. ISBN 0-7153-8004-4.