रे ब्रॅडबरी
रे ब्रॅडबरी | |
---|---|
जन्म | २२ ऑगस्ट १९२० वॉकिगन, इलिनॉय |
मृत्यू | ५ जून, २०१२ (वय ९१) [१] लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
साहित्य प्रकार | विज्ञान कथा, अत्यद्भूतिका, भयकथा, रहस्यकथा |
कार्यकाळ | इ.स. १९३८ - इ.स. २०१२ |
प्रसिद्ध साहित्यकृती | फॅरनहाइट ४५१, द मार्शियन क्रॉनिकल्स, समथिंग विकेड धिस वे कम्स |
स्वाक्षरी |
रे डगलस ब्रॅडबेरी (इंग्लिश: Ray Bradbury) (२२ ऑगस्ट, इ.स. १९२० - ५ जून, इ.स. २०१२) हे अमेरिकन विज्ञान कथा, अत्यद्भूतिका, भयकथा, रहस्यकथा लेखक होते. ते त्यांच्या फॅरनहाइट ४५१ (इ.स. १९५३) या पुस्तकासाठी प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्यांच्या विज्ञानकथांचे संग्रह द मार्शियन क्रॉनिकल्स (इ.स. १९५०) आणि द इल्लुस्ट्रेटेड मॅन (इ.स. १९५१) हे सुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांवर व कथांवर आधारित चित्रपट बनविले गेले आहेत.
संदर्भ
- ^ जोनास, जेराल्ड. "रे ब्रॅडबरी, प्रमुख विज्ञानकथाकार यांचे वयाच्या ९१व्या वर्षी निधन (इंग्लिश: Ray Bradbury, Master of Science Fiction, Dies at 91)" (इंग्लिश भाषेत). जून ५, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)