Jump to content

रूद्देवाडी

  ?रूद्देवाडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरअक्कलकोट
जिल्हासोलापूर जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

रूद्देवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे. अक्कलकोट वरून गाणगापूरला जात असताना हे गाव लागते.

भौगोलिक स्थान

हवामान

येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.

लोकजीवन

गावामध्ये लिंगायत, धनगर, माळी, नवबौद्ध, चांभार, कोळी, सुतार, कोलाटी समाजाचे लोक गावांमध्ये राहतात.

गावामध्ये बहुसंख्य लोक कन्नड भाषा बोलतात. सर्व व्यवहार मराठी मध्ये होते.

गावातील आडनावे - पाटील, देसाई, ममनाबाद, शाखापुरे, जमादार, करवीर, पुजारी, शेरी, टेंगळे, कोतली, हिरोळी, शिंगे, कोलाटी, गोलर, सुतार, हडपद, वरनाळे.

प्रेक्षणीय स्थळे

भुताळसिद्धेश्वर महाराज प्रसिद्ध देवस्थान आहे.

प्राचीन काळातील कल्लालिंग मंदिर आहे.

हनुमान मंदिर, नंदी बसवेश्वर, रेवणसिद्धेश्वर मंदिर आहे.

गावामधून बोरी नदी वाहते. ही नदी भीमा नदीची उपनदी आहे.

गावाच्या हद्दीमध्ये हवा मल्लिनाथ आश्रम आहे.

नागरी सुविधा

गावाच्या शेजारी मातोश्री लक्ष्मी शुगर मिल हा खाजगी साखर कारखाना आहे. गावामध्ये प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण व उच्च माध्यमिक शिक्षण घेण्याची सुविधा आहे.

गावामध्ये सार्वजनिक वाचनालय आहे.

जवळपासची गावे

दुधनी, संगोळगी (बसवन), चिंचोळी , बोरोटी, आंदेवडी(जहागीर), बबलाद, मुगळी.

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate