रूचिरा गुप्ता
रूचिरा गुप्ता या एक पत्रकार आणि कार्यकर्त्या आहेत. महिलांच्या हक्कांसाठी आणि लैंगिक तस्करी निर्मूलनासाठी काम करणाऱ्या अपने ऍप या गैर-सरकारी संस्थेच्या त्या संस्थापक आहेत.[१][२]
२००९ मध्ये, गुप्ता यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी स्थापन केलेल्या क्लिंटन फाऊंडेशनद्वारे नागरी समाजातील नेतृत्वासाठी क्लिंटन ग्लोबल सिटीझन अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. [३][४]तसेच फ्रान्स सरकारने त्यांच्या कामाची दखल घेत प्रतिष्ठित शेवेलियर डी लॉर्डे डु मेरिटे (नाइट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट) पुरस्कार २०१७ मध्ये त्यांना प्रदान केला.[५]
कारकीर्द
गुप्ता यांनी पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी द टेलिग्राफ न्यूजपेपर (कोलकाता), द संडे ऑब्झर्व्हर (कोलकाता, भारत), बिझनेस इंडिया मॅगझिन (दिल्ली, भारत), आणि ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) दक्षिण एशिया (दिल्ली, भारत) साठी काम केले. त्यांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत त्यांनी महिलांचे हक्क, भारताच्या ईशान्येतील सशस्त्र संघर्ष, जातीय संघर्ष आणि अल्पसंख्याक समस्यांवर विस्तृतपणे कव्हर केले. ओपन डेमोक्रसी, पास ब्लू, सीएनएन, टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू, द गार्डियन आणि इतरांसाठी लैंगिक तस्करी आणि महिलांच्या हक्कांच्या मुद्द्यांवर त्या विस्तृतपणे लिहित आहेत.[६][७][८]
- संयुक्त राष्ट्रे
पत्रकारितेनंतर त्या युनायटेड नेशन्समध्ये गेल्या, तिथे त्यांनी इराण, नेपाळ, थायलंड, कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम, म्यानमार, इंडोनेशिया, कोसोवो आणि फिलीपिन्सच्या सरकारांसोबत काम केले. यापैकी काही देशांना त्यांनी राष्ट्रीय कृती योजना आणि मानवी तस्करीविरूद्ध कायदे विकसित करण्यासाठी पाठिंबा दिला.[९] त्यांनी कायद्याची अंमलबजावणी आणि अभियोजकांसाठी तस्करीशी लढा देण्यासाठी दोन नियमावली लिहिली आहे, ज्याला UNODC आणि UNIFEM द्वारे समर्थन मिळाले आहे. गुप्ता यांनी ऑक्टोबर २००० मध्ये शांततेच्या संदेशवाहकांच्या (गुडविल अॅम्बेसेडर) पहिल्या मेळाव्यासाठी युनिसेफसोबतही काम केले.[१०]
संदर्भ
- ^ "Gupta honored for work against sex trafficking". The Times of India. 2022-03-08 रोजी पाहिले.
- ^ "The Wire: The Wire News India, Latest News,News from India, Politics, External Affairs, Science, Economics, Gender and Culture". m.thewire.in. 2022-03-08 रोजी पाहिले.
- ^ "Ruchira Gupta wins Clinton Global Citizen Award". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2009-09-27. 2022-03-08 रोजी पाहिले.
- ^ "Ruchira Gupta gets Global Citizen Award - Rediff.com". m.rediff.com. 2022-03-08 रोजी पाहिले.
- ^ "Activist Ruchira Gupta awarded prestigious French award". www.dnaindia.com. 2022-03-08 रोजी पाहिले.
- ^ "Ruchira Gupta • The Lakshmi Mittal and Family South Asia Institute". The Lakshmi Mittal and Family South Asia Institute (इंग्रजी भाषेत). 2022-03-08 रोजी पाहिले.
- ^ "Gupta, Ruchira". SAGE Publications Inc (इंग्रजी भाषेत). 2022-03-05. 2022-03-08 रोजी पाहिले.
- ^ "Stopping sex trafficking in India". Global Citizen (इंग्रजी भाषेत). 2022-03-08 रोजी पाहिले.
- ^ "Trust Women - Ruchira Gupta". web.archive.org. 2012-11-27. रोजी मूळ पानापासून संग्रहित2012-11-27. 2022-03-08 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ United Nations, Press release (2000). "UN.ORG".