रूई (बार्शी)
?रूई महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | बार्शी |
जिल्हा | सोलापूर जिल्हा |
भाषा | मराठी |
नेते | औदुंबर भाऊ भोसले |
बोलीभाषा | मराठी |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड | • ४१३४०६ • एमएच/१३ |
रूई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
जवळचे शहर _- १) उस्मानाबाद १८ किमी
२) तुळजापूर १६ किमी
३) वैराग १४ किमी
४) बार्शी ३८ किमी
हवामान
येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
खंडोबा मंदिर रुई
रुई येथील खंडोबा मंदिर प्रसिद्ध आहे. दर वर्षी चंपाषष्ठी या दिवशी गावात खूप मोठी यात्रा भरते.या वेळी अनेक गावातून भाविक येतात.
दत्त मंदिर
श्री दत्त मंदिर हे मंदिर भेट देण्यासारखे आहे. प्रत्येक वर्षी दत्तजयंती निमित्त रक्तदानाचा उपक्रम ग्रामस्थांच्या वतीने राबवला जातो.
तसेच गावात विठ्ठल रुक्मिणी मंदिर , मारुती मंदिर
अशी अनेक धार्मिक स्थळे आहेत
नागरी सुविधा
जवळपासची गावे
मालेगाव
गौडगाव
उपळ
भाळगाव
जवळगाव
काटी
चिलवडी