रुबेन दारियो
रुबेन दारियो Rubén Darío | |
---|---|
जन्म | जानेवारी १८ १८६७ मातागल्पा विभाग, निकाराग्वा |
मृत्यू | फेब्रुवारी ६, १९१६ ल्योन, निकाराग्वा |
राष्ट्रीयत्व | निकाराग्वा |
पेशा | कवी |
स्वाक्षरी |
रुबेन दारियो (स्पॅनिश: Rubén Darío; जानेवारी १८ १८६७ - फेब्रुवारी ६, १९१६) हा एक निकाराग्वाचा कवी होता. १९व्या शतकाच्या अखेरीस आधुनिकवादी चळवळ सुरू करण्यामध्ये दारियोचा मोठा वाटा होता. विसाव्या शतकातील स्पॅनिश साहित्यावर दारियोचा मोठा प्रभाव आढळून येतो.
दारियोच्या काव्यात फ्रेंच साहित्याचा पगडा जाणवतो. आपल्या काव्यकारकिर्दीत सुरुवातीच्या काळात व्हिक्तोर युगो तर नंतर थेयोफाइल गॉतिये ह्यांच्याकडून दारोयोने प्रेरणा घेतली.