रुबी सिया
रुबी सिया | |
---|---|
जन्म | १८८४ फुझोऊ, चीन |
मृत्यू | १९५५ शांघाय, चीन |
पेशा | शिक्षक, मेथडिस्ट मिशनरी |
प्रसिद्ध कामे | कॉर्नेल कॉलेजचे पहिले चीनी पदवीधर (१९१०) |
रुबी एफ. सिया (१८४४ - १९५५) ही एक चिनी शिक्षिका होती. आयोवातील कॉर्नेल कॉलेजची पहिली चिनी पदवीधर होती. ती १९१० च्या वर्गाची सदस्य होती.
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
तिचा जन्म फूचो (फुझोऊ) येथे झाला होता. ती सिया हेंग - तोऊ या मेथडिस्ट मंत्री आणि शिक्षिकेची मुलगी होती.[१][२] तिचा काका सिया सेक ओंग हा देखील मेथडिस्ट मंत्री आणि शिक्षक होता.[३] प्रथम १९०० मध्ये उत्तर अमेरिकेत प्रवास केला आणि १९१० मध्ये मेथडिस्ट चर्च - संलग्न कॉर्नेल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. यारितीने ती या शाळेची पहिली चिनी पदवीधर बनली.[४] तिला १९१८ मध्ये मानद पदव्युत्तर पदवी आणि १९३६ मध्ये मानद डॉक्टरेट प्रदान केली.[५][६] १९११ आणि १९१२ मध्ये बाल्टीमोर महिला महाविद्यालय आणि १९२० आणि १९२१ मध्ये अमेरिकेच्या भेटीदरम्यान टीचर्स कॉलेज कोलंबिया विद्यापीठ अभ्यासक्रम घेतला होता.
अमेरिकेत असताना ती ' द चायनीज स्टुडंट्स मंथली' याची सहयोगी संपादक होती.[७][१] ते मासिक जागतिक चिनी विद्यार्थ्यांच्या नियतकालिकात योगदान देणारे होते.[८] तिच्या चुलत बहीणीचे माबेल सिया हिचेही शिक्षण आयोवामध्ये झाले होते.
कारकिर्द
सियाने १९०४ मध्ये अमेरिकन ख्रिश्चन मिशनऱ्यांसोबत चीनला प्रवास केला.[९] तिच्या महाविद्यालयीन वर्षांमध्ये चर्चच्या कार्यक्रमांमध्ये तीने सहयोग दिला होता.[१०] महाविद्यालयानंतर चीनला परतल्यावर, सियाने पारंपारिक अपेक्षा ओळखून शिक्षणात आधुनिकीकरण आणि [११] मुलींच्या शिक्षणासाठीची बाजु जोरदार मांडली. उदाहरणार्थ, महिलांनी घरगुती जबाबदाऱ्या अधिक शास्त्रोक्त पद्धतीने हाताळण्यासाठी तिने रसायनशास्त्र, पोषण आणि शरीरविज्ञान अभ्यासक्रमांना प्रोत्साहन दिले.[१२] ती ह्वा नान कॉलेज[१३] फूचो येथील मेथोडिस्ट मिशनरी महिला महाविद्यालयात [१४] संगीताची शिक्षिका आणि संचालक होती.[१५][१६] ती फूचो वुमन्स पॅट्रिओटिक सोसायटीची संस्थापक होती.[१७]
सिया १९२० ते १९२१ पर्यंत कॉन्फरन्स प्रतिनिधी आणि व्याख्याता म्हणून अमेरिकेत परतली.[५][१८] ती १९३६ मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर गेली होती. त्यावेळेस तिने आंतरराष्ट्रीय मेथोडिस्ट परिषदेत भाग घेतला होता.[१९] तेथे तिने व्याख्याने दिली, आणि तिच्या महाविद्यालयासाठी निधी गोळा केला.[४] तिने १९४० आणि १९४१ मध्ये अमेरिकेत आणखी एक व्याख्यान दौरा केला.[२०][२१]
प्रकाशने
- "शिक्षण चीनी प्रबोधन मुख्य घटक" (१९०७)[२२]
- "परदेशात शिक्षण घेतलेल्या चिनी स्त्रिया" (१९०७)[२३]
- "चीनची औद्योगिक शिक्षणाची गरज" (१९१०)[२४]
वैयक्तिक आयुष्य
सियाचे १९५५ मध्ये शांघाय शहरात निधन झाले. त्यावेळेस ती सुमारे सत्तर वर्षांची होती.[४]
संदर्भ
- ^ a b Barish, Daniel (2023-10-02). "The World's Chinese Students' Journal and American Influenced Education Reforms on the Eve of Revolution in China, 1905-1911". In Kyong-McClain, Jeff; Lee, Joseph Tse-Hei (eds.). From Missionary Education to Confucius Institutes: Historical Reflections on Sino-American Cultural Exchange (इंग्रजी भाषेत). Taylor & Francis. p. 1908. ISBN 978-1-000-96433-2.
- ^ Sia, Sek Ong. Sia Sek Ong and the Self-support Movement in Our Foochow Mission : the Story of His Life and Work (इंग्रजी भाषेत). Missionary Society of the Methodist Episcopal Church.
- ^ "Talks of Her Native China; Chinese Girl Just from Foochow Mystified by Troubles". Sioux City Journal. 1900-06-17. p. 6. 2023-10-31 रोजी पाहिले – Newspapers.com द्वारे.
- ^ a b c Maravetz, Steve. "Cornell's First Chinese Graduate" Cornell College News Center (June 26, 2017).
- ^ a b "Native Chinese Spoke Here". The Tarkio Avalanche. 1921-04-15. p. 1. 2023-10-31 रोजी पाहिले – Newspapers.com द्वारे.
- ^ "Christian Chinese Women". The Pawnee Chief. 1912-03-15. p. 8. 2023-10-31 रोजी पाहिले – Newspapers.com द्वारे.
- ^ "Masthead". The Chinese Students' Monthly. 5 (4). February 1910.
- ^ "Chinese Students in America". The Minneapolis Journal. 1902-11-08. p. 21. 2023-10-31 रोजी पाहिले – Newspapers.com द्वारे.
- ^ "Missionaries Go to China; Quite a Delegation from Northwest Iowa". Sioux City Journal. 1904-07-17. p. 11. 2023-10-31 रोजी पाहिले – Newspapers.com द्वारे.
- ^ "Report of Convention". Adams County Free Press. 1910-07-20. p. 6. 2023-10-31 रोजी पाहिले – Newspapers.com द्वारे.
- ^ Rogers, Dorothy G. (2020-02-06). Women Philosophers Volume I: Education and Activism in Nineteenth-Century America (इंग्रजी भाषेत). Bloomsbury Publishing. p. 32. ISBN 978-1-350-07061-5.
- ^ Ye, Weili (1994). ""Nü Liuxuesheng": The Story of American-Educated Chinese Women, 1880s-1920s". Modern China. 20 (3): 326. ISSN 0097-7004.
- ^ Wallace, L. Ethel (1956). Hwa Nan College: The Woman's College of South China (इंग्रजी भाषेत). United Board for Christian Colleges in China. p. 132.
- ^ "Cornell College". Journal of the Association of College Alumnae. 11 (5): 324. January 1918.
- ^ McCoy, Janet Rice. "Woman's College, WFMS, Foochow - GCAH". General Commission on Archives and History, United Methodist Church. 2023-11-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-10-31 रोजी पाहिले.
- ^ Clark, Elsie G. (June 1917). "The W. F. M. S. Jubilee in Foochow". The China Christian Advocate. 4 (5): 6.
- ^ Hartford, Mabel C. (March 1913). "The Woman's Patriotic Society". Woman's Missionary Friend. 45 (3): 98–99.
- ^ "Delegate". The Des Moines Register. 1920-05-02. p. 11. 2023-10-31 रोजी पाहिले – Newspapers.com द्वारे.
- ^ "Chinese Woman Addresses Meet; Miss Ruby Sia, Here from Native Land, Speaks at West Branch". The Muscatine Journal and News-Tribune. 1936-04-09. p. 3. 2023-10-31 रोजी पाहिले – Newspapers.com द्वारे.
- ^ "Dr. Ruby Sia to Speak at Church Group Meeting". The Montclair Times. 1940-11-08. p. 16. 2023-10-31 रोजी पाहिले – Newspapers.com द्वारे.
- ^ "Five Churches to Have Pulpit Guests". Los Angeles Evening Citizen News. 1941-01-11. p. 2. 2023-10-31 रोजी पाहिले – Newspapers.com द्वारे.
- ^ Sia, Ruby (March–June 1907). "Education the Chief Factor in Chinese Enlightenment". The World's Chinese Students' Journal. 1 (5–6): 12–14.
- ^ Sia, Ruby. "Chinese Women Educated Abroad" World's Chinese Students' Journal (November/December 1907): 27-32.
- ^ Sia, Ruby. "China's Need of Industrial Education." Chinese Students' Monthly (March, 1910) 300 (1910).