रुक्मिणी
रुक्मिणी | |
मराठी | रुक्मिणी |
संस्कृत | रुक्मिणी |
निवासस्थान | द्वारिका |
वडील | भिष्मक |
पती | कृष्ण |
अपत्ये | प्रद्युम्न |
अन्य नावे/ नामांतरे | रखुमाई, कृष्णसंगिनी, |
या अवताराची मुख्य देवता | लक्ष्मी |
रुक्मिणी ही कृष्णाची पत्नी होती. हिच्या पित्याचे नाव भीष्मक असून आईचे नाव शुद्धमती होते. भीष्मक विर्दभाचा राजा होता. देवी रुक्मिणीच्या मोठ्या भावाचे नाव सुभानदेव असे होते. रुक्मिणीस महाराष्ट्रात रखुमाई असेही म्हणतात.
जीवन
रुक्मिणीचे लग्न शिशुपालाशी होण्यापूर्वीच श्रीकृष्णाने तिला तिच्या इच्छेनुसार अंबामाता मंदिरातून पळवून नेले आणि तिच्याशी विवाह केला. पुढे त्यांना जो मुलगा झाला त्याचे नाव त्यांनी प्रद्युम्न असे ठेवले.
जेव्हा यादवांचा संहार झाला तेव्हा रुक्मिणीने अग्निप्रवेश करून आत्महत्या केली.
साहित्यातील उल्लेख
रुक्मिणीस्वयंवर या विषयावर अनेक काव्ये, नाटके आणि कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. त्यांतील प्रमुख -
- नरेंद्र कवी याने लिहिलेले रुक्मिणीस्वयंवर हे (अपूर्ण राहिलेले) काव्य. हे काव्य लिहून झाल्यावर देवगिरीचा उपान्य राजा रामदेवराय राजा याने हे काव्या त्याच्या नावाने प्रसिद्ध व्हावे अशी आज्ञा केली. नरेंद्रकवीला दरवडेखोराच्या हाती हे काव्य देणे अर्थात मान्य नव्हते. काव्यात काही सुधारणा करून ते काव्य दुसऱ्या दिवशी परत दरबारात आणतो असे सांगून नरेंद्रकवीने ताॆ बाड घरी नेले. तो आणि त्याचे दोन भाऊ यांनी रातोरात जागून काव्याची नक्कल करण्यास सुरुवात केली. पहाटेपर्यंत फक्त ९०० ओळी लिहून पूर्ण झाल्या. रामदेवरायाची माणसे आली आणि त्त्यांनी त्या मूळ काव्याची संपूर्ण प्रत ताब्यात घेतली आणि रामदेवरायराजाला नेऊन दिली. राजसत्तेच्या या पाशवी दर्शनाने नरेंद्रकवी राजसभेला विटला आणि तो महानुभाव पंथात दाखल झाला. त्या पंथाने ते काव्य सांकेतिक लिपीत लिहून प्रसिद्ध केले. कानामात्रेचाही फरक न झालेले या काव्याची लिखित प्रत इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांच्या हाती पडली. सांकेतिक लिपीचा उलगडा करून ते काव्य राजवाड्यांनी मराठीत आणले. हे ९०० ओळींचे अपुरे काव्य महानुभावपंथीय त्यांच्या पवित्र सात ग्रंथापैकी एक मानतात.
असे असले असले तरी, राजवाड्यांचा अनुवाद केवळ विद्वानांच्या उपयोगाचा आहे, मराठी सामान्य रसिक वाचक अजूनही मुळच्या महानुभावीय रसास्वादाला पारखे झाले आहेत.
- एकनाथांनी लिहिलेला रुक्मिणीस्वयंवर हा आख्यानपर ग्रंथ.
- कवि सामराजानेसुद्धा रुक्मिणीस्वयंवर नावाचे काव्य लिहिले आहे. ते काव्य प्रथम विनायक लक्ष्मण भावे यांनी प्रकाशात आणले.
- सखारामतनय (सखारामसुत) नावाच्या एका कवीनेही आर्याबद्ध रुक्मिणीस्वयंवर लिहिले आहे.
- नरेंद्रकृत आद्य मराठी महाकाव्य (डॉ. सुहासिनी इर्लेकर)
- नाथांचे रुक्मिणी-स्वयंवर (डॉ. सुहासिनी इर्लेकर)
- नरेंद्र : रुक्मिणी स्वयंवर (आनंद साधले)
हे सुद्धा पहा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत