रीस विदरस्पून
ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री. Reese Witherspoonová na Filmovém festivalu v Torontu v září 2014 | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
स्थानिक भाषेतील नाव | Reese Witherspoon |
---|---|
जन्म तारीख | मार्च २२, इ.स. १९७६ न्यू ऑर्लिन्स Laura Jeanne Reese Witherspoon |
टोपणनाव |
|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
|
नागरिकत्व | |
शिक्षण घेतलेली संस्था | |
व्यवसाय |
|
राजकीय पक्षाचा सभासद | |
मातृभाषा |
|
अपत्य |
|
वैवाहिक जोडीदार |
|
सहचर |
|
उल्लेखनीय कार्य |
|
पुरस्कार |
|
अधिकृत संकेतस्थळ | |
लॉरा जीन रीस विदरस्पून (जन्म: २२ मार्च १९७६, न्यू ऑर्लिअन्स, लुईझियाना, अमेरिका) ही एक अमेरिकन अभिनेत्री आणि निर्माता आहे. एक अकादमी पुरस्कार, एक प्राइमटाइम एमी पुरस्कार आणि दोन गोल्डन ग्लोब पुरस्कारांसह ती विविध पुरस्कारांची प्राप्तकर्ता आहे. टाइम मासिकाने तिला २००६ आणि २०१५ मध्ये जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून नाव दिले आणि फोर्ब्सने २०१९ आणि २०२१ मध्ये तिला जगातील १०० सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये सूचीबद्ध केले. २०२१ मध्ये, फोर्ब्स मासिकाने तिला जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री म्हणून घोषित केले आणि २०२३ मध्ये , $४४० दशलक्ष अंदाजे निव्वळ संपत्तीसह तिला अमेरिकेतील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक म्हणून नाव देण्यात आले.
कारकीर्द
विदरस्पूनने तिची कारकीर्द किशोरवयात सुरू केली, तिने द मॅन इन द मून (१९९१) मधून स्क्रीनवर पदार्पण केले. तिला १९९९ मध्ये क्रूल इंटेन्शन्स चित्रपटामध्ये सहाय्यक भूमिकेसह आणि ब्लॅक कॉमेडीसाठी यश मिळाले. कॉमेडी लीगली ब्लॉन्ड (२००१) आणि २००३ चा त्याचा पुढचा भाग लीगली ब्लॉंड २: रेड, व्हाइट अँड ब्लॉंड यामध्ये एल वुड्सची भूमिका केल्याबद्दल आणि रोमँटिक कॉमेडी स्वीट होम अलाबामा (२००२) मध्ये भूमिका केल्याबद्दल तिला व्यापक ओळख मिळाली. वॉक द लाइन (२००५) या संगीतमय बायोपिकमध्ये जून कार्टर कॅश (अमेरिकन देशी गायक आणि गीतकारच्या) भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार मिळाला.[१] विदरस्पूनने चित्रपटात स्वतः गायन केले आणि तिची गाणी थेट प्रेक्षकांसमोर सादर करावे लागले. तिला गायन प्रशिक्षक रॉजर लव्ह यांच्या मदतीने या भूमिकेसाठी गाणे शिकण्यासाठी सहा महिने घालवावे लागले. अकादमी पुरस्कारासोबत तिने गोल्डन ग्लोब्स, ब्रिटिश अकादमी फिल्म अवॉर्ड्स आणि स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार जिंकले.
बऱ्याच काळानंतर तिचा एकमेव बॉक्स-ऑफिस यशस्वी रोमँटिक नाट्यपट वॉटर फॉर एलिफंट्स (२०११) होता. कारकिर्दीच्या मंदीच्या काळात, विदरस्पूनने वाईल्ड (२०१४) या नाट्यपटाची निर्मिती आणि अभिनय करून पुनरागमन केले, ज्यासाठी तिला दुसरे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे अकादमी पुरस्कारांमध्ये नामांकन मिळाले.[२] ह्यामध्ये तिने पॅसिफिक क्रेस्ट ट्रेलच्या १००० मैलाच्या पदयात्रेवरच्या अमेरिकन लेखिका चेरिल स्ट्रायडचे चित्रण केले होते.[३]
त्यानंतर तिच्या "हॅलो सनशाईन" कंपनीच्या अंतर्गत अनेक महिला-नेतृत्वातील साहित्यिक रूपांतरांमध्ये तिने मुख्यतः टेलिव्हिजनमध्ये निर्मिती आणि अभिनय केला आहे. यामध्ये एचबीओ नाटक मालिका बिग लिटिल लाईज (२०१७-१९), ऍपल टीव्ही+ नाटक मालिका द मॉर्निंग शो (२०१९ पासून सुरू), आणि हुलीवरीललिटील फायर्स एव्ह्रीव्हेयर (२०२०) यांचा समावेश आहे. यापैकी पहिल्यासाठी, तिने २०१७ चा उत्कृष्ट मर्यादित मालिकेसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कार जिंकला. तिने गॉन गर्ल (२०१४) आणि व्हेअर द क्रॉडॅड्स सिंग (२०२२) आणि डेझी जोन्स अँड द सिक्स (२०२३) या लघुपट रुपांतरणांची निर्मिती देखील केली आहे.
विदरस्पूनकडे "रीस बुक क्लब"[४] आणि "ड्रेपर जेम्स" (कपड्यांची कंपनी) देखील आहे.[५] ती मुलांसाठी आणि महिलांसाठी अनेक संघटनांमध्ये गुंतलेली आहे. ती चिल्ड्रन्स डिफेन्स फंड (CDF) च्या बोर्डावर काम करते आणि २००७ मध्ये एव्हॉन उत्पादनांची ग्लोबल ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली, ती महिलांच्या कारणांसाठी समर्पित धर्मादाय एव्हॉन फाऊंडेशनच्या मानद अध्यक्ष म्हणून काम करते.
वैयक्तिक जीवन
विदरस्पून लहान असताना तिचे कुटुंब जर्मनीतील वीसबाडेन शहरात आणि नॅशव्हिल, टेनेसी येथे राहिले होते.[६] तिचे वडीलांनी, जॉन ड्रेपर विदरस्पूनने, युनायटेड स्टेट्स आर्मी रिझर्व्हमध्ये लेफ्टनंट म्हणून काम केले होते. २०१२ पर्यंत ते कान-नाक-घसा तज्ञ म्हणून खाजगी रुग्णालयामध्ये होते.[७][८] तिची आई, मेरी एलिझाबेथ "बेट्टी" विदरस्पून, वँडरबिल्ट विद्यापीठात नर्सिंगची प्राध्यापक होती आणि तिने बालरोग नर्सिंगमध्ये पीएचडी केली होती.[९][१०] तिचे पालक अद्याप कायदेशीररित्या विवाहित आहेत, जरी ते १९९६ मध्ये वेगळे झाले.[११]
मार्च १९९७ मध्ये विदरस्पून अभिनेता रायन फिलिपला तिच्या २१ व्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटली.[१२] त्यांनी ५ जून १९९९ रोजी दक्षिण कॅरोलिनामध्ये लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत, मुलगी एवा एलिझाबेथ फिलिप, (जन्म ९ सप्टेंबर १९९९) आणि मुलगा डेकॉन रीझ फिलिप, (२३ ऑक्टोबर २००३). ऑक्टोबर २००६ मध्ये, विदरस्पून आणि फिलिप यांनी त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली. त्यांचा विवाह अधिकृतपणे ५ ऑक्टोबर २००७ रोजी संपला व फिलिप आणि विदरस्पून त्यांच्या मुलांचा संयुक्त ताबा घेतात.[१३][१४]
विदरस्पून २००७ ते २००९ पर्यंत तिचा सहकलाकार जेक जिलेनहाल याच्याशी संबंधात होती.[१५][१६] फेब्रुवारी २०१० मध्ये, ती टॅलेंट एजंट आणि क्रिएटिव्ह आर्टिस्ट एजन्सीमधील मोशन पिक्चर टॅलेंटचे सह-प्रमुख जिम टोथ यांच्याशी नातेसंबंधात असल्याची नोंद झाली.[१७][१८] त्यांनी २६ मार्च २०११ रोजी कॅलिफोर्नियामध्ये लग्न केले. त्यांना एक मुलगा आहे, टेनेसी जेम्स टॉथ, ज्याचा जन्म २७ सप्टेंबर २०१२ रोजी झाला.[१९] मार्च २०२३ मध्ये, विदरस्पून आणि टॉथ यांनी लग्नाच्या ११ वर्षानंतर घटस्फोटाची घोषणा केली.[२०]
संदर्भ
- ^ "The 78th Academy Awards | 2006". Oscars.org | Academy of Motion Picture Arts and Sciences (इंग्रजी भाषेत). December 10, 2019 रोजी पाहिले.
- ^ "The 87th Academy Awards | 2015". Oscars.org | Academy of Motion Picture Arts and Sciences (इंग्रजी भाषेत). December 10, 2019 रोजी पाहिले.
- ^ McNary, Dave (October 11, 2013). "Reese Witherspoon's 'Wild' Adds Michiel Huisman, W. Earl Brown". Variety. October 13, 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. October 16, 2013 रोजी पाहिले.
- ^ "Reese's Book Club". Reese’s Book Club (इंग्रजी भाषेत). March 1, 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 5, 2022 रोजी पाहिले.
- ^ "Reese Witherspoon launches Draper James lifestyle brand". CBS News. May 6, 2015. May 7, 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 6, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Monitor". Entertainment Weekly. No. 1251. March 22, 2013. p. 25.
- ^ "Reese Witherspoon biography". Yahoo! Movies. June 5, 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. October 25, 2007 रोजी पाहिले.
- ^ Slschy, Ingrid (December 1, 2005). "That's Reese: stepping into the ring of fire". Interview. ISSN 0149-8932.
- ^ Communications and Marketing (June 4, 2012). "College of Nursing Honors 2012 Outstanding Alumni Award Recipients". uthsc.edu. January 2, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 20, 2016 रोजी पाहिले.
- ^ Wills, Dominic. "Reese Witherspoon biography (page 1)". Tiscali. October 15, 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. November 26, 2007 रोजी पाहिले.
- ^ "Reese Witherspoon's parents in bigamy dispute". CNN. May 10, 2012. January 23, 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 23, 2015 रोजी पाहिले.
- ^ de Kretser, Leela (October 31, 2006). "Split end for a 'Legal blonde'". New York Post. August 1, 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 1, 2012 रोजी पाहिले.
- ^ "Reese Files Divorce Petition". Court Documents TMZ. October 11, 2007 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 22, 2007 रोजी पाहिले.
- ^ "Reese Witherspoon and Ryan Phillippe Legally Free to Wed Others". October 11, 2007 रोजी मूळ पानापासून संग्रहित. October 11, 2007 रोजी पाहिले.
- ^ Thomson, Katherine (April 5, 2007). "Reese Witherspoon & Jake Gyllenhaal Get Close". People. June 7, 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. July 29, 2017 रोजी पाहिले.
- ^ Wihlborg, Ulrica; Silverman, Stephen M. (November 29, 2009). "Reps Claim Jake and Reese Are Still Together". People. March 1, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 29, 2020 रोजी पाहिले.
- ^ "Reese Witherspoon's Date Night". People. February 25, 2010. April 20, 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 29, 2020 रोजी पाहिले.
- ^ "Reese Witherspoon's Birthday Getaway with Jim Toth". People. March 22, 2010. April 20, 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 29, 2020 रोजी पाहिले.
- ^ Jordan, Julie (September 27, 2012). "Reese Witherspoon Welcomes Son Tennessee James". People. September 28, 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 29, 2020 रोजी पाहिले.
- ^ VanHoose, Benjamin (March 24, 2023). "Reese Witherspoon and Husband Jim Toth Announce 'Difficult Decision' to Divorce After 11 Years of Marriage". People.