Jump to content

रीना कौशल धर्मशक्तू

रीना कौशल धर्मशक्तू (१९७० - ) ही दक्षिण ध्रुवावर जाणारी पहिली भारतीय महिला आहे. राष्ट्रमंडळाच्या आठ इतर स्त्रियांसह अंटार्क्टिका बेटात ९१५ किलोमीटर स्कीइंग करून ३१ डिसेंबर २००९ रोजी रीना दक्षिण ध्रुवावर पोहोचली. १९६० साली स्थापन झालेल्या महिलांच्या या राष्ट्रमंडळदलातील स्त्रियांनी ४० दिवसांत आपला प्रवास पूर्ण केला.

सुरुवातीचे जीवन

धर्मशक्तू हिचा जन्म पंजाबमध्ये झाला. तिचे वडील पंजाबी तर आई उत्तर प्रदेशामधील होती. ती दार्जिलिंगमध्ये मोठी झाली. दार्जिलिंगमध्ये हिमालय पर्वतारोहण संस्था येथे तिने पर्वतारोहण अभ्यासक्रमा केला. हिमालयायाध्ये तिने अनेक पर्वतारोहण मोहिमांचे आयोजन केले. तिचे पती प्रेम राज सिंग धर्मशक्तू हे एक यशस्वी गिर्यारोहक आहेत. एकूण ३८ पेक्षा अधिक शिखरांवर ते चढले असून ते माउंट एव्हरेस्टवर सहा वेळा चढले आहेत.