रियाध प्रांत
रियाध منطقة الرياض | |
सौदी अरेबियाचा प्रांत | |
रियाधचे सौदी अरेबिया देशामधील स्थान | |
देश | सौदी अरेबिया |
राजधानी | रियाध |
क्षेत्रफळ | ४,०४,२४० चौ. किमी (१,५६,०८० चौ. मैल) |
लोकसंख्या | ६७,७७,१४६ |
घनता | १७ /चौ. किमी (४४ /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | SA-01 |
रियाध (अरबी: منطقة الرياض) हा सौदी अरेबिया देशाच्या १३ प्रांतांपैकी एक आहे. सौदी अरेबियाच्या मध्य भागात वसलेला रियाध प्रांत क्षेत्रफळ व लोकसंख्या ह्या दोन्ही बाबतीत देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा प्रांत आहे. रियाध प्रांतामधील ७५ टक्के लोकवस्ती रियाध महनगरामध्ये एकवटली आहे.
सौदी अरेबियाचा विद्यमान राजा सलमान १९६३ ते २०११ दरम्यान रियाध प्रांताचा राज्यपाल होता.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत