Jump to content

रिचर्डसन (टेक्सास)

रिचर्डसन अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील एक शहर आहे. डॅलस-फोर्ट वर्थ महानगराचा भाग असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१४ च्या अंदाजानुसार १,०८,६१७ इतकी होती.

येथे भ्रमणध्वनी उपकरणे बनविणाऱ्या अनेक कंपन्यांची मोठी कार्यालये आहेत. यात एटी अँड टी, एरिक्सन, वेरायझन, सिस्को सिस्टम्स, सॅमसंग, मेट्रो पीसीएस, झीटीई, कोर्वो, फुजित्सु, टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स, इ.चा समावेश आहे. याशिवाय ब्लू क्रॉस ब्लू शील्ड ऑफ टेक्सासचे मुख्यालय येथे आहे. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास ॲट डॅलसचे आवारही रिचर्डसनमध्ये आहे.