Jump to content

रिचर्डची तिरचिमणी

रिचर्डची तिरचिमणी

रिचर्डची तिरचिमणी (इंग्लिश:Richard's Pipit; हिंदी:चरचरी, रुगाईल) हा एक पक्षी आहे.

माध्यम आकाराच्या चिमणीएवढी असते. वरील भागाचा वर्ण गर्द तपकिरी व त्यावर तांबूस चिन्हे. गर्द तपकिरी शेपटीची किनार पांढरीअसते. टी उडताना ठळकपणे दिसून येते. खालील भागाचा रंग पिवळट व छाती तपाकीरी. नर-मादी दिसायला सारखे असतात. तसेच धान चिमणीप्रमाणे पाय लांब असतात.

वितरण

बंगाल ते भूतान, पूर्वेकडे ब्रह्मदेश. भारतीय द्विपकल्पात क्वचितच आढळतात. पश्चिमेकडे फतेगडते गोवा यांना जोडणाऱ्या पूर्व सीमेवर. नेपाळ तराई व खाटमांडू खोरे. दक्षिणेकडे केरळ, तामिळनाडू व श्रीलंका, तसेच अंदमान बेटे.

निवासस्थाने

शेतीचा प्रदेश, धान्याची कापणी झाल्यानंतरची रिकामी राने. उजाड, डोंगराळ व वाळवंटी प्रदेश व गवताळ प्रदेश.

संदर्भ

  • पक्षिकोष - मारुती चितमपल्ली