रिचर्ड क्रॉमवेल
रिचर्ड क्रॉमवेल (इंग्लिश: Richard Cromwell) (ऑक्टोबर ४, इ.स. १६२६ - जुलै १२, इ.स. १७१२) हा इंग्लंड, स्कॉटलंड व आयर्लंड यांचा दुसरा लॉर्ड प्रोटेक्टर होता. तो ऑलिव्हर क्रॉमवेलाचा दुसरा मुलगा होता. सप्टेंबर ३, इ.स. १६५८ ते मे २५, इ.स. १६५९ या अवघ्या नऊ महिन्यांच्या कालखंडात तो अधिकारारूढ राहिला.