Jump to content

राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना

राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना ही भारतातील केंद सरकार पुरस्कृत दारिद्रय़रेषेखालील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विमा योजना आहे. यात अवघ्या ३० रुपयांमध्ये नावनोंदणी करून दारिद्रय़रेषेखालील कुटुंबियांना दरवर्षी ३० हजार रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळतो.१ एप्रिल २००८ पासून असंघटीत क्षेत्रातील दारिद्र्यरेषेखालील लोकांना आरोग्य विमा पुरविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्वास्थ विमा योजना सुरू करण्यात आली . टप्प्याटप्याने या योजनेचा विस्तार करण्यात आला असून असंघटीत क्षेत्रातील दारिद्ररेषेखालील नव्हे,तर इतरही गट लक्ष्यगट म्हणून निवडण्यात आले आहेत .जसे बांधकाम मजूर, रेल्वे हमाल , रस्ता विक्रते,नरेगामधील मजूर ,विडी कामगार, खाणकामगार, रिक्षाचालक , सफाई कामगार इत्यादी , १ एप्रिल २०१५ पासून ही योजना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे.

योजनेची उद्दिष्ट्ये

१) आरोग्य खर्चामुळे येणाऱ्या आर्थिक संकाटांविरुद्ध आर्थिक संरक्षण पुरविणे .

२) असंघटीत क्षेत्रातील व्यक्तीपर्यंत उत्तम प्रतीच्या आरोग्यसेवा पोहचविणे .

३) योजनेच्या लाभार्थ्याला रुग्णालयात दाखल केल्यास येणाऱ्या खर्चासाठी प्रतिकुटुंब ३०,००० रुपयांपर्यंत खर्च विमा कंपनीतर्फे पुरविला जातो , यासाठी विमा कंपनीकडे लाभार्थी कुटुंबाचा आरोग्य विमा योजना उतरविणारी ही योजना आहे , विम्याचा हप्त्याचा भार शासन ( ७५% केंद्र व राज्य २५% ) उचलते .

४) लाभार्थ्याची ओळख व विमा सेवा देताना सुलभता यावी, यासाठी आरोग्य स्मार्ट कार्ड वितरीत करण्यात आली आहेत , मार्च २०१२ पर्यंत २.५ कोटी स्मार्ट कार्ड वितरीत करण्यात आले होते.