राष्ट्रीय सीमाशुल्क, उत्पाद आणि नार्कोटिक्स अकादमी
संकेतस्थळ | http://www.nacen.gov.in |
---|
राष्ट्रीय सीमाशुल्क, उत्पाद आणि नार्कोटिक्स अकादमी ही संस्था भारतीय महसूल सेवेतील अधिकाऱ्यांना सीमाशुल्क, केंद्रीय अबकारी कर व सेवाकर या केंद्रीय कायद्यांचे आणि नार्कोटिक्स कायद्याचे प्रशिक्षण देते.
या संस्थेत भारतीय सनदी सेवेत थेट निवड झालेले व मसूरीच्या लाल बहाद्दूर शास्त्री अकादमी येथून प्राथमिक शिक्षण घेतलेले अधिकारी, हे कर कायदे, आंतरराष्ट्रीय व्यापार व अमली पदार्थ कायदे यासंबंधी सखोल प्रशिक्षण घेतात.