राष्ट्रीय सागर संशोधन संस्था
राष्ट्रीय सागर संशोधन संस्था ही १ जानेवारी १९६६ रोजी पणजी, गोवा येथे स्थापना झालेली भारत सरकारची संस्था आहे.
उद्दिष्टे
- सागराच्या अंतरगातील जैविक संपत्तीचा शोध घेणे. त्याचा अभ्यास करणे. मच्छिमारीसाठी नवनवीन अशा योग्य जागा शोधणे. जीवशास्त्रीय माहितीचा उपयोग करून सागरी उत्पादनात कशी वाढ करता येईल हे पाहणे.
- सागरी भुगर्भातील संशोधन करून खनिज द्रव्याचा शोध घेणे. व ती सागराबाहेर काढण्याचे तंत्रज्ञान विकसित करून त्याचे उत्पादन करणे.
- सागराच्या पोटात असणारे प्राणि आणि वनस्पती यांचे संशोधन करून त्यांच्यापासून रासायनिक द्रव्य मिळविणे.
- भरती ओहोटीच्या लाटात प्रचंड उर्जा असते. तिच्यापासून विजनिर्मिती करण्याचे तंत्र विकसित करणे.
- सागरी प्रदेशाच्या होणाऱ्या धुपेची शास्त्रीय पाहणी करणे व त्यावर योग्य तो उपाय शोधुन काढणे.
- सागराचे होणारे प्रदुषण थांबविणे व त्यावर उपाययोजना शोधुन काढणे.
- सागरी संशोधनाची विविध उपकरणे तयार करणे, सागरी हवामानाचे संशोधन करणे जागतिक पातळीवर सागरी भुगर्भ संशोधन प्रकल्पांना सहकार्य करणे.