राष्ट्रीय संरक्षण निधी
राष्ट्र संरक्षणात येणारी मदत व त्याचे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय संरक्षण निधीची स्थापना करण्यात आली आहे. या मध्ये मिळालेला निधी सशस्त्र सेनादलातील सैनिक (निमलष्करी दलातील सैन्य अंतर्भूत) व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाकरिता वापरला जातो. या निधीचे भारताचे पदसिद्ध पंतप्रधान अध्यक्ष असतात. हा निधी पूर्णपणे लोकांनी दिलेल्या देणग्यांवर अवलंबून असून यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्याही स्वरूपाची तरतूद नसते.
ठळक वैशिष्ट्ये
भारतीय सेना दल तसेच निमलष्करी दलासाठी ही योजना आहे. संरक्षण दलाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना व विधवांना या योजने अंतर्गत मासिक शिष्यवृत्ती दिली जाते.
इतर मदत
- सियाचीन बेस कॅम्प रूग्णालयात जवानांना वैद्यकीय मदत म्हणून सिटी स्कॅन मशीन
- आयएनएस विराट विमानवाहू युद्धनौकांवर वैद्यकीय व फिटनेस सुविधा
- इंफाळ मध्ये कुकी इन कॉम्प्लेक्समध्ये ग्रंथालय व समाजमंदिर तथा संग्रहालयाची निर्मिती