राष्ट्रीय महामार्ग ७ (जुने क्रमांकन)
राष्ट्रीय महामार्ग ७ | |
---|---|
लांबी | २,३६९ किमी |
सुरुवात | वाराणसी, उत्तर प्रदेश |
मुख्य शहरे | वाराणसी - जबलपुर - नागपूर - हैदराबाद - बंगळूर - सेलम - मदुराई - कन्याकुमारी |
शेवट | कन्याकुमारी, तामिळनाडू |
जुळणारे प्रमुख महामार्ग | रा. म. २ - वाराणसी रा. म. २९ - वाराणसी रा. म. ५६ - वाराणसी रा. म. २७ - मंगावान रा. म. ७५ - रेवा रा. म. ७८ - कटनी रा. म. १२ - जबलपुर रा. म. २६ - लखनादोन रा. म. ६९ - नागपूर रा. म. ६ - नागपूर रा. म. १६ - अरमुर रा. म. २०२ - हैद्राबाद रा. म. ९ - हैद्राबाद रा. म. १८ - कुर्नूल रा. म. ६३ - गूटी रा. म. २०६ - अनंतपुर रा. म. ४ - बंगळूर रा. म. २०९ - बंगळूर रा. म. ४६ - कृष्णगिरी रा. म. ६६ - कृष्णगिरी रा. म. २१९ - कृष्णगिरी रा. म. ६८ - सेलम रा. म. ४७ - सेलम रा. म. ६७ - करुर रा. म. ४५ - दिंडीगुल रा. म. २०९ - दिंडीगुल रा. म. ४९ - मदुराई रा. म. २०८ - मदुराई रा. म. ४५-बी - मदुराई रा. म. ७-ए - तिरुनलवेली रा. म. ४७ - कन्याकुमारी |
राज्ये | उत्तर प्रदेश: १२८ किमी मध्य प्रदेश: ५०४ किमी महाराष्ट्र: २३२ किमी आंध्र प्रदेश: ७५३ किमी कर्नाटक: १२५ किमी तामिळनाडू: ६२७ किमी |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय महामार्ग ७ हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. २,३६९ किमी धावणारा हा महामार्ग वाराणसी व कन्याकुमारी ह्या धार्मिक स्थळांना जोडतो[१]. वाराणसी, मिर्झापुर, मंगावान, रेवा, जबलपुर, लखनादोन, नागपूर, हैदराबाद, कुर्नूल, गूटी, बंगळूर, होसुर, कृष्णगिरी, धर्मपुरी, सेलम, नमक्कळ, करुर, दिंडीगुल, मदुराई, विरुधुनगर, तिरुनलवेली ही रा. म. ७ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ७चा मोठा हिस्सा (लाखनादों ते कन्याकुमारी) भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पाचा भाग आहे.
शहरे व गावे
राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
- ह्या महामार्गावरील बंगळूर ते कृष्णगिरी या शहरांमधिल ९४ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे.[२]
- ह्या महामार्गावरील लखनादोन ते कन्याकुमारी या शहरांमधिल १,२८२ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पाचा एक भाग आहे.[३]
हे सुद्धा पहा
- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
- राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)
संदर्भ
- ^ भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी Archived 2011-10-27 at the Wayback Machine. विदागारातील आवृत्ती
- ^ "राष्ट्रीय महामार्ग ७चे सुवर्ण चतुष्कोण मध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). 2009-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-10-01 रोजी पाहिले.
- ^ "राष्ट्रीय महामार्ग ७चे उत्तर-दक्षिण कॉरिडॉर मध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). 2009-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-10-01 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
- भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ