Jump to content

राष्ट्रीय मधुमक्षिका दिन

मधमाशी

"राष्ट्रीय मधुमक्षिका दिवस " हा प्रतिवर्षी ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा केला जातो.[] जगात मधमाशी विषयक जाणीव जागृती करण्यासाठी अमेरिकेतील मधमाशी पालन करणा-या सदस्यांनी हा दिवस साजरा करायला प्रारंभ केला.[] यांच्या आयोजकांच्या मतानुसार एका साध्या संकल्पनेवर आधारित अशी या विशेष दिवसाची योजना केलेली आहे[]. २०१८ साली हा दिवस १८ ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे.[]

हेतू

मधमाशी

जगभरातील मधमाशी पालकांनी एकत्र यावे, मधमाशी पालन आणि त्यासंबंधीची अन्य उत्पादने यांच्या संबंधी अधिक विकसित आणि प्रगत विचार करावा, कृती आराखडा तयार करावा, परस्परांच्या अनुभवांची देवाणघेवाण व्हावी अशा हेतूने हा दिवस साजरा केला जातो.या विषयाशी संबंधित काम करीत असलेल्या संस्था, संघटना यांचेही यानिमित्ताने वैचारिक व कृतीरूप आदानप्रदान होते. या उपक्रमाची सुरुवात इ.स. २००९ साली झाली. मधमाशीपालन करणा-या छोट्या समूहाने यासाठी विनंती अर्ज दाखल केला आणि त्याचे औपचारिक घोषणापत्र अमेरिकेने तयार केले. पेनसिल्व्हानिया विद्यापीठाच्या कृषी विभागातर्फे या विषयाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे विशेष कार्य नियोजित केले जाते. २२ ऑगस्ट रोजी सुरू झालेला हा उपक्रम नंतर प्रतिवर्षी ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा करणे निश्चित झाले.

चित्रपट्टीका

मधमाशी पालन

हे ही पहा

संदर्भ

  1. ^ "World Honey Bee Day | Days Of The Year". Days Of The Year (इंंग्रजी भाषेत). १८-८-२०१८ रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ Horn, Tammy (२१-४-२००६). Bees in America: How the Honey Bee Shaped a Nation (इंग्रजी भाषेत). University Press of Kentucky. ISBN 0813191637. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "National Honey Bee Day 2018 – National US Awareness Days Events Calendar 2018 & 2019". www.awarenessdays.com (इंंग्रजी भाषेत). 2022-06-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८-८-२०१८ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "| HoneyLove". honeylove.org (इंग्रजी भाषेत). १८-८-२०१८ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)