Jump to content

राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेने भरविलेली आतापर्यंतची ज्ञात ’बंधुता साहित्य संमेलने’; ही बहुतेक संमेलने पुणे जिल्ह्यात भरली होती. : -

  • १ले राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, पुणे येथे मे १९९९मध्ये झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा.ग. जाधव होते.
  • २ऱ्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. निर्मलकुमार फडकुले होते. हे संमेलन पिंपरी-विंचवडच्या सांगवी या उपनगरात झाले.
  • २रे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, अध्यक्ष - नागनाथअण्णा नायकवडी व नागनाथ कोतापल्ले; वाळवा
  • ३रे राष्ट्रीय बंधुता संमेलन संमेलन पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात झाले; संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ.रावसाहेब कसबे होते.
  • ४थे संमेलन चिखली येथे, संमेलनाध्यक्ष डॉ.यू.म. पठाण.
  • ५वे बंधुता साहित्य संमेलन, नाशिक येथे २२ फेब्रुवारी २००४ला भरले होते. संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे होते.
  • ६वे संमेलन अहमदनगरला. अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो (की कोतापल्ले?)
  • ८वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन २४ आणि २५ फेब्रुवारी २००७ या कालावधीत पुण्यात झाले. ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य संमेलनाध्यक्ष होते.
  • ९वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, २३ फेब्रुवारी २००८ रोजी भरले होते; स्वागताध्यक्ष उत्तम कांबळे होते. अध्यक्ष होते डॉ. मा.प. मंगुडकर.
  • १०वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन भोसरी येथे, (२००९), संमेलनाध्यक्षा डॉ. सिसिलिया कार्व्हालो
  • ११वे : २३-२४ जानेवारी २०१० या तारखांना ११वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन तळेगावमध्ये झाले. साहित्यिक गंगाधर पानतावणे या संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • १२वे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानतर्फे २२-२३ जानेवारी २०११ या तारखांना जुन्नर तालुक्‍यातील चाळकवाडी (पिंपळवंडी) येथे बारावे "राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन' झाले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे हे संमेलनाध्यक्ष होते.
  • १३वे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानच्या वतीने तेरावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन पुण्यात २१-२२जानेवारी २०१२ या तारखांना झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर होते.
  • १४वे तळेगाव दाभाडे येथे, संमेलनाध्यक्ष कॉ. गोविंद पानसरे होते.
  • ११-१२ जानेवारी २०१४मध्ये मंचरला भरलेल्या १५व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अ‍ॅडव्होकेट भास्करराव आव्हाड होते..
  • १७-१८ जानेवारी २०१५ या काळात पुणे शहरात झालेल्या १६व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळे होते.
  • १७व्या अखिल भारतीय बंधुता साहित्य संमेलनच्या अध्यक्षा डॉ. अश्विनी धोंगडे होत्या. संमेलन २०१६ सालच्या फेब्रुवारीत झाले..
  • २६-२७ डिसेंबर, २०१६ या कालावधीत पुण्यातील नवी पेठ येथे झालेल्या १८व्या संमेलनाचे अध्यक्ष प्रकाश रोकडे होते. संमेलनादरम्यान विजय वडवेकर, अनुराधा गोरखे, गंगाधर रासगे, शिरीष चिटणीस, डॉ रझिया पटेल, डॉ. रामनाथ चव्हाण आणि बाबुराव घोलप महाविद्यालय यांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.
  • १९वे : २४ व २५ डिसेंबर २०१७. इस्लामपूर; अध्यक्ष कवी उद्धव कानडे. या संमेलनादरम्यान शेतकरी कामगार पक्षाचे प्रा. एन.डी. पाटील यांना राष्ट्रीय बंधुता पुरस्कार प्रदान झाला.
  • २०वे : ३-४ जानेवारी २०१९; भोसरी (पुणे); प्रीतम-प्रकाश महाविद्यालय, इंद्रायणनगर, भोसरी (पुणे); संमेलनाध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस. संमेलनादरम्यान ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना 'प्रा. रा.ग. जाधव साहित्यसाधना पुरस्कार' दिला गेला..
  • २१वे : २१ व २२ डिसेंबर २०१९; प्रीतम-प्रकाश महाविद्यालय, इंद्रायणनगर, भोसरी (पुणे); संमेलनाध्यक्ष : डाॅ अशोककुमार पगारिया

पहा : साहित्य संमेलने; दलित साहित्य संमेलन