Jump to content

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट

Национальная кинопремия за лучший фильм на тамильском языке (ru); শ্রেষ্ঠ তামিল ভাষার চলচ্চিত্র বিভাগে জাতীয় চলচ্চিত্র পুরস্কার (bn); National Film Award/Bester Film in Tamilisch (de); ナショナル・フィルム・アワード 最優秀タミル語長編映画賞 (ja); National Film Award for Best Feature Film in Tamil (en); National Film Award du meilleur long métrage en Tamoul (fr); राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट (mr); சிறந்த தமிழ்த் திரைப்படத்துக்கான தேசிய விருது (ta) Indian film award (en); Indian film award (en); Wikimedia-Liste (de) ナショナル・フィルム・アワード タミル語長編映画賞 (ja)
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट 
Indian film award
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारपुरस्काराची श्रेणी,
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
स्थान भारत
प्रायोजक
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील एक श्रेणी आहे. भारतातील माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हलद्वारे दरवर्षी हे पुरस्कार सादर करण्यात येतात.[] हा पुरस्कार तमिळ भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटास सादर केला जातो आणि चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकाला दिला जातो. हा एक रजत कमल पुरस्कार आहे. २०१७ला या पुरस्कारात रजत कमल, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पारितोषिकात समाविष्ट होते. नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो.[]

भारताच्या संविधानाच्या आठव्या अनुसूची मधील २२ अधिकृत भाषांपैकी १८ भाषांतील चित्रपटांना हा प्रदान करण्यात येतो. ह्या भाषा आहेत, आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू आणि उर्दू. ह्या भाषा व्यतिरिक्त, अजून काही भाषांतील चित्रपटांना असे पुरस्कार देण्यात येतात, जसे कि भोजपुरी, गारो, हरियाणवी, जसरी, इंग्रजी, खासी, कोडवा, कोकबोरोक, लडाखी, मिशिंग, मिझो, मोनपा, पांगचेनपा, रभा, शेरडोकपेन, तुलू आणि वानचो.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची स्थापना १९५४ मध्ये "उच्च सौंदर्याचा आणि तांत्रिक मानक आणि शैक्षणिक आणि संस्कृती मूल्य असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीस प्रोत्साहित करण्यासाठी" केली गेली आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी पुरस्कारांचा समावेश करण्याचे नियोजनही केले. पुरस्कार "चित्रपटांसाठी राज्य पुरस्कार" म्हणून स्थापित करण्यात आले होते. परंतु १९५६ मध्ये १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्याचे "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" असे नामकरण करण्यात आले.

२१ डिसेंबर १९५५ रोजी सादर झालेल्या २र्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधून सात प्रादेशिक भाषांमध्ये (बंगाली, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, तामिळ आणि तेलगू) चित्रपटांसाठी पुरस्कारांना प्रारंभ झाला. "सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रपतींचे रौप्य पदक", "द्वितीय सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रमाणपत्र" आणि "तृतीय सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रमाणपत्र" या तीन पुरस्कारांची स्थापना करण्यात आली. नंतरचे दोन प्रमाणपत्र पुरस्कार १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (१९६७) पासून बंद केले गेले.

एस. एम. श्रीरमुलु नायडू दिग्दर्शित १९५४ च्या मलायक्कल्लन या चित्रपटासाठी प्रथम तामिळमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रपतींचे रौप्य पदक मिळवीले. तामिळमधील द्वितीय आणि तृतीय सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठीचे प्रमाणपत्र अनुक्रमे आंध नाल आणि एधर पराधथू यांनी प्राप्त केले. तीन दिग्दर्शकांना हा पुरस्कार त्यांच्या चार चित्रपटांसाठी मिळाला आहे: दिग्दर्शक जोडी कृष्णन-पांजू (१९५६, १९६२, १९६४, १९६५), ए. भिमसिंह (१९५९, १९६०, १९६१, १९६४) आणि के. बालाचंदर (१९६९, १९७५, १९८१, १९८४).

संदर्भ

  1. ^ "About National Film Awards". Directorate of Film Festivals. 25 ऑक्टोबर 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 नोव्हेंबर 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "National Awards 2015, as it happened: Winners, wishes and morel". India Today. 3 मे 2015. 23 मे 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 मे 2015 रोजी पाहिले.