राष्ट्रीय क्रिकेट अकादमी
संक्षेप | NCA |
---|---|
स्थापना | इ.स. २००० |
संस्थापक | राज सिंग डुंगरपूर |
प्रकार | क्रिकेट अकादमी |
कायदेशीर मान्यता | फाउंडेशन |
उद्देश | खेळाडू विकास |
स्थान | |
सेवा | प्रशिक्षण, मार्गदर्शन, पुनर्वसन |
संचालक | व्हीव्हीएस लक्ष्मण |
पालक संस्था | बीसीसीआय |
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) ही भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता असलेल्या तरुण क्रिकेट खेळाडूंचा विकास करण्याच्या उद्देशाने बंगळूर, भारत येथील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) एक क्रिकेट सुविधा आहे. त्याची स्थापना इ.स. २००० मध्ये झाली. ही अकादमी एम. चिन्नास्वामी स्टेडियमजवळ आहे. या सुविधेचा उपयोग जखमी खेळाडूंच्या पुनर्वसनासाठीही केला जातो.
माजी क्रिकेट खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण हे एनसीएचे संचालक आहेत.