राष्ट्रीय औषधी शिक्षण आणि संशोधन संस्था
राष्ट्रीय औषधी शिक्षण आणि संशोधन संस्था - नाईपर (NIPERs - National Institutes of Pharmaceutical Education and Research) ही भारतातील औषधशास्त्राच्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांचा समूह आहे. भारत सरकारने राष्ट्रीय औषधी शिक्षण आणि संशोधन संस्थांना राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था म्हणून घोषित केले आहे. ते औषधनिर्माण विभाग, रसायने आणि खते मंत्रालयाच्या अधिपत्याखाली स्वायत्त संस्था म्हणून काम करतात.
मोहाली
अहमदाबाद
हाजीपुर
हैदराबाद
कोलकाता
रायबरेली
गुवाहाटी
संस्थाने
# | नाव | शहर | राज्य | स्थापना | संकेतस्थळ |
---|---|---|---|---|---|
1 | राष्ट्रीय औषधी शिक्षण आणि संशोधन संस्था, साहिबजादा अजितसिंग नगर | मोहाली | पंजाब | 1998 | niper.gov.in/ |
2 | राष्ट्रीय औषधी शिक्षण आणि संशोधन संस्था, अहमदाबाद | अहमदाबाद | गुजरात | 2007 | niperahm.ac.in/ |
3 | राष्ट्रीय औषधी शिक्षण आणि संशोधन संस्था, हाजीपुर | हाजीपुर | बिहार | 2007 | niperhajipur.ac.in/ Archived 2021-06-24 at the Wayback Machine. |
4 | राष्ट्रीय औषधी शिक्षण आणि संशोधन संस्था, हैदराबाद | हैदराबाद | तेलंगणा | 2007 | niperhyd.ac.in/ |
5 | राष्ट्रीय औषधी शिक्षण आणि संशोधन संस्था, कोलकाता | कोलकाता | पश्चिम बंगाल | 2007 | niperkolkata.edu.in/ Archived 2022-02-27 at the Wayback Machine. |
6 | राष्ट्रीय औषधी शिक्षण आणि संशोधन संस्था, गुवाहाटी | गुवाहाटी | आसाम | 2008 | niperguwahati.ac.in/ Archived 2022-03-02 at the Wayback Machine. |
7 | राष्ट्रीय औषधी शिक्षण आणि संशोधन संस्था, रायबरेली | रायबरेली | उत्तर प्रदेश | 2008 | niperraebareli.edu.in/ |
प्रवेश प्रक्रिया
NTA (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) द्वारे घेतलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट (GPAT) ही एम. फार्मा प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आहे.[१]
शैक्षणिक
पदव्युत्तर अभ्यासक्रम
- विज्ञान शिरोमणि - औषधशास्त्र (विज्ञानशाखेची पदवीत्तर पदवी Master of Science - Pharma) हा २ वर्षांचा पूर्ण-वेळ अभ्यासक्रम वेगवेगळ्या विषयांमध्ये प्रदान केला जातो.
- Natural Products - नैसर्गिक उत्पादने
- Medicinal Chemistry - औषधी रसायनशास्त्र
- Pharmacology & Toxicology - औषधोपचारशास्त्र आणि विषशास्त्र
- Pharmacoinformatics - औषधी माहिती तंत्रज्ञान
- Pharmaceutics - औषधनिर्माण शास्त्र
- Biotechnology - जैवतंत्रज्ञान
- Pharmacy Practice - औषध तयार करणे आणि वापरण्याचे विज्ञान पद्धती
- तंत्रज्ञान शिरोमणि - औषधशास्त्र (Master of Technology -Pharma.)
- व्यवसाय प्रशासन मास्टर शिरोमणि - औषधशास्त्र (Master of Business Administration - Pharma.)
Doctoral/Fellowship साहचर्य
- Doctor of Philosophy (PhD विद्यावाचस्पती) - हा अभ्यासक्रम पूर्ण-वेळ आणि अर्ध-वेळ अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो.
- Medicinal Chemistry - औषधी रसायनशास्त्र
- Natural Products - नैसर्गिक उत्पादने
- Pharmacology & Toxicology - औषधोपचारशास्त्र आणि विषशास्त्र
- Pharmaceutics - औषधनिर्माण शास्त्र
- Pharmacy Practice - औषध तयार करणे आणि वापरण्याचे विज्ञान- पद्धती
- Biotechnology - जैवतंत्रज्ञान
हे सुद्धा पहा[संपादन]
- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद
- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
- रसायन आणि खते मंत्रालय, भारत सरकार
- औषधनिर्माण शास्त्र
- अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था
संदर्भ
- ^ "GRADUATE PHARMACY APTITUDE TEST | GPAT | India" (इंग्रजी भाषेत). 2022-03-02 रोजी पाहिले.
साचा:राष्ट्रीय औषधी शिक्षण आणि संशोधन संस्था