राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
---|---|
पक्षाध्यक्ष | अजित पवार |
सचिव | टी.पी. पितांबरन मास्तर देविप्रसाद त्रिपाठी अख्तर हसन रीझवी व्ही. राजेशवरन |
लोकसभेमधील पक्षनेता | सुनील तटकरे |
राज्यसभेमधील पक्षनेता | प्रफुल्ल पटेल |
स्थापना | १० जून, १९९९ |
संस्थापक | शरद पवार, पी.ए.संगमा, तारिक अन्वर |
मुख्यालय | १०, बिशंबर दास मार्ग, नवी दिल्ली - ११०००१ |
विभाजित | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१९९९) |
विभाजन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार (२०२४) |
युती | संयुक्त पुरोगामी आघाडी१९९९-२०२३) राष्ट्रीय लोकशाही आघाडी(२०२३) |
लोकसभेमधील जागा | १/५४५ |
राज्यसभेमधील जागा | १/२४५ |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (इंग्रजी: Nationalist Congress Party) हा भारताच्या एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआ मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.[ संदर्भ हवा ]
पार्श्वभूमी
इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी१० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.[१] स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले.
२० जून २०१२ रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी पी. ए. संगमांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला.[२]
पक्षाचे चिन्ह
१० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अॅनालॉग) [घड्याळ] हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे.
पक्षातील महत्त्वाच्या व्यक्ती
- शरद पवार
- प्रफुल्ल पटेल
- सुनील तटकरे
- जयंतराव पाटील
- हसन मुश्रीफ
- अनिल देशमुख
- दिलीप वळसे पाटील
- नवाब मलिक
- संदीप क्षीरसागर
- जितेंद्र आव्हाड
- बाळासाहेब पाटील
- प्रफुल्ल मनोहरभाई पटेल
- सूर्यकांता पाटील
- अजित पवार
- सुप्रिया सुळे
- आर.आर. पाटील
- छगन भुजबळ
- धनंजय मुंडे
- अमोल कोल्हे
- राजेश टोपे
- प्राजक्त तनपुरे
- संजय बनसोडे
संदर्भ व नोंदी
- ^ Sangma meets Sonia, first time in a decade द टाइम्स ऑफ इंडिया, 2 June 2009.
- ^ "I have quit NCP, will contest presidential polls: PA Sangma" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
- संकेतस्थळ[permanent dead link]