राष्ट्र सेविका समिती
राष्ट्र सेविका समिती ही भारतातील हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी महिला संघटना असून ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिला आघाडी मानली जाते[१]. लक्ष्मीबाई केळकर यांच्या पुढाकाराने ऑक्टोबर २५, १९३६ रोजी राष्ट्रसेविका समिती स्थापण्यात आली.[२] राष्ट्र सेविका समिती ह्या संघटना राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या आहेत. अखंड ८० वर्षे कार्यरत असणारी एकमेव सर्वात मोठी अखिल भारतीय हिंदू स्त्री संघटना होय.[३] महिलांनी केवळ शिक्षित नव्हे तर सक्षम बनावे, तसेच मानसिक, शारीरिक व बौद्धिकरीत्या सक्षम बनावे, हा दृष्टिकोन समोर ठेवून लक्ष्मीबाई केळकर यांनी राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली. देशभरात तीन हजारहून अधिक शाखा व अन्य सेवा कार्यात समितीचे योगदान आहे.[४] राष्ट्रभक्तीचे संस्कार रुजविण्यासाठी राष्ट्रसेविका समितीचे उद्देश आहे. [५] संपूर्ण देशभरात राष्ट्रसेविका समितीचे कार्य सुरू असून सुमारे बारा देशात हिंदू सेविका समितीच्या नावाने कार्य सुरू आहे.
स्वरूप
समितीची शाखा प्रतिदिन सायंकाळी ५ ते ६ एक तास भरते. त्यात प्रारंभी प्रार्थना, नंतर खेळ, मनोरंजनात्मक कार्यक्रम व बौद्धिक चर्चाही असतात. अत्यंत शिस्तबद्ध असे हे महिला संघटन आहे. सर्व सेविकांना स्वसंरक्षण कसे करावे, स्वतःचे आरोग्य कसे सांभाळावे, स्वावलंबी कसे व्हावे याविषयी मार्गदर्शन केले जाते. समितीचा एक भगवा ध्वज आहे. कारण समितीत कोणीही व्यक्तीला मोठेपण देत नाही, तर भारत राष्ट्राला श्रेष्ठ मानतात. म्हणून भारतमाता वंदनीय व भारत देशाचे प्रतीक म्हणजे ध्वजवंदन केले जाते.
कार्य
राष्ट्रसेविका समितीच्या वतीने नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक या शहरांतून महिलांसाठी पौराहित्य वर्ग चालवले जातात. बौद्धिक, शारीरिक कार्यशाळा प्रकार घेण्यात येतात. महिलांवरील अन्याय-अत्याचार विरोधात समिती लढा देत आहे. समितीतर्फे विविध सण, उत्सव साजरे केले जातात. विविध ज्वलंत विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली जातात. विविध प्रकारची शिबिरे घेतली जातात.[६] महिलांसाठी व्यावसायिक कार्यशाळा घेतल्या जातात. आदिवासी विद्यार्थिनींसाठी विद्यालये सुरू करण्यात आली आहेत. गृहिणींसाठी वसतिगृहे स्थापन करण्यात आलेली आहेत.[७]
आदर्श
समितीमध्ये आदर्श माता म्हणून राष्ट्रमाता जिजामाता यांची पुण्यतिथी, कर्तृत्त्ववान महिला म्हणून देवी अहल्याबाई होळकरांची पुण्यतिथी, नेतृत्ववान महिला म्हणून स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई ह्यांची पुण्यतिथी हे कार्यक्रम प्रामुख्याने घेतले जातात.
उत्सव
बुद्धीची देवता व दुष्टांचा संहार करणारी म्हणून शारदोत्सव व दुर्गोत्सव साजरे केले जातात. मात्र, हे सर्व उत्सव अत्यंत साधेपणाने, फार खर्च न करता साजरे होतात. राष्ट्रसेविका समितीच्या सेविकांनी पाच दिवसात ३ लाख ३० हजार ८१ सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.[८]
पुस्तके
- स्त्री शक्तीचा साक्षात्कार’ (ले.-दिनकर केळकर)
- ‘दीपज्योती नमोऽस्तुते’ (ले.- सुशीला महाजन)
हे सुद्धा पाहा
- सुमित्रा महाजन
- दुर्गा वाहिनी
बाह्य दुवे
- वंदनीय मावशीबाईंचे चरित्र Archived 2007-07-16 at the Wayback Machine.
- हिंदू महिलांची संघटना Archived 2016-03-05 at the Wayback Machine.
संदर्भ
- ^ "संवाद संकेतस्थळ". 2021-09-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-09-03 रोजी पाहिले.
- ^ Prabhasakshi (2021-10-15). "राष्ट्र सेविका समिति का गठन जिन उद्देश्यों के साथ हुआ था, उस पर कितना खरा उतरा संगठन ?". Prabhasakshi. 2022-06-29 रोजी पाहिले.
- ^ Prabhasakshi (2021-10-15). "राष्ट्र सेविका समिति का गठन जिन उद्देश्यों के साथ हुआ था, उस पर कितना खरा उतरा संगठन ?". Prabhasakshi. 2022-06-29 रोजी पाहिले.
- ^ "राष्ट्र सेविका समिति क्या है ?". Voice of Hinduism - Hinduism book in PDF | Latest news | History | Religion |. 2022-06-29 रोजी पाहिले.
- ^ "राष्ट्र सेविका समिति : संगठन विस्तार में भूमिका निभाएंगी बहनें : Bhagalpur News". Dainik Jagran (हिंदी भाषेत). 2022-06-29 रोजी पाहिले.
- ^ "राष्ट्र सेविका समितीची निष्ठावान सेविका". www.evivek.com (इंग्रजी भाषेत). 2022-06-29 रोजी पाहिले.
- ^ "प्रेरणा : राष्ट्र सेविका समितीची". www.mahamtb.com. 2022-06-29 रोजी पाहिले.
- ^ "इतिहास". rashtrasevikasamiti.org. 2020-07-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-06-29 रोजी पाहिले.