Jump to content

रावसाहेब रामराव पाटील

रावसाहेब रामराव पाटील ऊर्फ आर. आर. पाटील (१६ ऑगस्ट, इ.स. १९५७:अंजनी, तासगाव तालुका, सांगली जिल्हा, महाराष्ट्र - १६ फेब्रुवारी, इ.स. २०१५:मुंबई, महाराष्ट्र) हे महाराष्ट्रातील राजकारणी होते. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य, महाराष्ट्र विधानसभा सदस्य (आमदार) व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री होते. ते लोकांमध्ये स्वच्छ चारित्र्याचे व प्रामाणिक नेते म्हणून प्रसिद्ध होते[ संदर्भ हवा ]. ते इ.स. १९९० पासून सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

२६ नोव्हेंबर, इ.स. २००८ रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्यानंतर पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांनंतर बेजबाबदार वक्तव्यांसाठी आर.आर. पाटील हे टीकेचे लक्ष्य बनले होते. यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला [].

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "आर. आर. पाटलांचा राजीनामा". 2008-12-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-10-06 रोजी पाहिले.

अधिक वाचा - महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....