रावसाहेब कसबे
रावसाहेब राणोजी कसबे | |
---|---|
जन्म | १२ नोव्हेंबर, १९४४ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
धर्म | बौद्ध |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | समिक्षा |
प्रसिद्ध साहित्यकृती | झोत |
प्रभाव | डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, कार्ल मार्क्स |
डॉ. रावसाहेब राणोजी कसबे ( १२ नोव्हेंबर, १९४४) हे मराठी लेखक आहेत. त्यांच्या झोत या पुस्तकात त्यांनी माधव सदाशिव गोळवलकर यांच्या द बंच ऑफ थॉट्स या पुस्तकातील विचारांची व त्या अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीची समीक्षा केली आहे.[१]
पुस्तके
रावसाहेब कसबे यांनी लिहिलेली पुस्तके खालीलप्रमाणे आहेत.[२]
- डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना[३]
- आंबेडकर आणि मार्क्स[४]
- आंबेडकरवाद - तत्त्व आणि व्यवहार[५]
- झोत
- देशीवाद समाज व साहित्य
- धर्मग्रंथ आणि मानवी जीवनप्रवाह
- भक्ती आणि धम्म
- मानव आणि धर्मचिंतन
- रेषेपलीकडील लक्ष्मण
- हिंदू मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद
- सम्यक प्ररिवर्तन
मिळालेले सन्मान व पुरस्कार
- गदिमा प्रतिष्ठानचा स्नेहबंध पुरस्कार (२०११)
- मिलिंद कला महाविद्यालयातर्फे मिलिंद समता पुरस्कार (२०१४)
- रावसाहेब कसबे हे नाशिकमध्ये भरलेल्या पाचव्या "कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे‘ अध्यक्ष होते. (४-५ जानेवारी २०१४)
- सुगावा प्रकाशनाचा ’सुगावा पुरस्कार’ (२०१४)
- रावसाहेब कसबे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे २०११ ते २०१६ या काळासाठीचे दोघांतले एक उपाध्यक्ष आहेत. (दुसरे चंद्रकांत शेवाळे)
- २०१५ सालच्या ५व्या सम्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
- रावसाहेब कसबे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष
संदर्भ
- ^ पाठक, डॉ प्र वि (2016-06-28). Sangh Karyacha Magova / Nachiket Prakashan: संघ कार्याचा मागोवा. Nachiket Prakashan. p. 4.
- ^ कसबेंची पुस्तके
- ^ Kasabe, Rāvasāheba · (1977). Do. Ambedakara ani Bharatiya rajyaghatana. Sugat Prakashan.
- ^ Kasabe, Rāvasāheba (1985). Āmbeḍakara āṇi Mārksa. Sugāvā Prakāśana.
- ^ Kasabe, Rāvasāheba (1978). Āmbeḍakaravāda. Buddhisṭa Pabliśiṅga Hāusa : mukhya vitaraka Ḍô. Āmbeḍakara Buka Ḍepo.
- झोत सुगावा प्रकाशन, पुणे. लेखक परिचय.