रावळगाव (दिंडोरी)
?रावळगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | दिंडोरी |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
रवळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव आदिवासी बहुल भागातील गाव असून सन २०११ च्या जनगणनेनुसार २८६० इतकी लोकसंख्या असलेले गयाचीवाडी, खोटऱ्याचीवाडी, दह्याचीवाडी अशा छोट्या वस्त्या असलेले ग्रुप ग्रामपंचायत आहे.
भौगोलिक स्थान
हे गाव दिंडोरी तालुक्यातील गाव असून दिंडोरी तालुक्याच्या दक्षिण दिशेला नाशिक शहराच्या बाजूला आहे. नाशिक तालुक्याच्या सीमेवर वसलेले हे गाव आहे. या गावाचे भौगोलिक क्षेत्र १६२४.५१ हेक्टर क्षेत्र असलेले भूखंड आहे. यामधील काही क्षेत्र पाटबंधारे विभागच्या कार्यक्षेत्रात येते तर काही क्षेत्र वनविभाग, ग्रामपंचायत गावठाण तसेच शेतकरी यांच्या मालकीचे असून एकूण क्षेत्रफळ हे- १६२४.५१ हेक्टर इतके आहे.
हवामान
येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
लोकजीवन
आदिवासी बहुल भाग असल्याने चाली रूढी परंपरा या पूर्वीपासून सुरू आहेत.
प्रेक्षणीय स्थळे
परम पूज्य श्री. संत गोरक्षनाथ बाबा यांची समाधी असून या ठिकाणी महादेव मंदिर असून वविध सन समारंभ हे या ठिकाणी साजरे केले जातात.
या परिसरात आळणी धारण हे पाटबंधारे विभागामार्फत बांधले असून या ठिकाणी पर्यटक फिरनेसाठी येत असतात.
देहरगड नावाचा किल्ला देखील जवळच असल्याने या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात
नागरी सुविधा
जवळपासची गावे
वाडगाव, दुगाव, दरी, गिरणारे, मातोरी, मुंगसरे, मखमलाबाद, मनोली, कोचरगाव, तिल्लोळी, विळवंडी, नळेगाव, राशेगाव, उमराळे, पिंप्रज, फोफळवाडे, आंबेगण.