रायनर मारिया रिल्के
रायनर मारिया रिल्के | |
---|---|
इ.स. १९०० च्या सुमारास रायनर मारिया रिल्के | |
जन्म नाव | रायनर मारिया रिल्के |
जन्म | डिसेंबर ४, इ.स. १८७५ प्राग, बोहेमिया, ऑस्ट्रिया-हंगेरी |
मृत्यू | डिसेंबर २९, इ.स. १९२६ मॉन्ट्रो, स्वित्झर्लंड |
राष्ट्रीयत्व | ऑस्ट्रियाई |
कार्यक्षेत्र | साहित्य |
साहित्य प्रकार | काव्य, कादंबरी |
कार्यकाळ | १८९४-१९२५ |
स्वाक्षरी |
रेने कार्ल विल्हेल्म जोहान जोसेफ मारिया रिल्के हा रायनर मारिया रिल्के (जर्मन : [ˈʁaɪnɐ maˈʁiːa ˈʁɪlkə]; डिसेंबर ४, इ.स. १८७५ - डिसेंबर २९, इ.स. १९२६) या नावाने अधिक प्रसिद्ध असणारा बोहेमियाई-ऑस्ट्रियाई कवी होता. जर्मन भाषेतील सर्वात महत्त्वपूर्ण कवींपैकी तो एक मानला जातो. पारंपरिक आणि आधुनिक काव्याच्या संक्रमणाशी नाते सांगणाऱ्या कविता रिल्केने लिहिल्या. इंग्रजी जगतात त्याची ड्युईनो एलिजिज ही काव्यकृती व लेटर्स टू अ यंग पोएट व निम्न-आत्मचरित्रात्मक नोटबुक्स ऑफ माल्टे लॉरिड्स ब्रिग ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.