रायतळी
?रायतळी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ०.५५६ चौ. किमी |
जवळचे शहर | डहाणू |
जिल्हा | पालघर जिल्हा |
लोकसंख्या • घनता | २,१७८ (२०११) • ३,९१७/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | वारली |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • ४०१६०२ • +०२५२८ • एमएच/४८ /०४ |
रायतळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे 'विजय मोबाईल सेंटर' नंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव १४ किमी अंतरावर आहे.येथे १.८७५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता असलेला लघु पाटबंधारा आहे.[१]
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३६८ कुटुंबे राहतात. एकूण २१७८ लोकसंख्येपैकी १०६७ पुरुष तर ११११ महिला आहेत. गावाची साक्षरता ३९.८० टक्के आहे.पुरुष साक्षरता ५०.६० आहे तर स्त्री साक्षरता २९.६३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ४४७ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या २०.५२ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.
नागरी सुविधा
गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात.
जवळपासची गावे
विवळवेढे, आवधणी, नवनाथ, गंजाड, चांदवड, शेलटी, पिंपळशेत खुर्द, वाढाणे, रानशेत, चारोटी, वाघाडी ही जवळपासची गावे आहेत.रायतळी ग्रामपंचायतीमध्ये चांदवड आणि रायतळी ही गावे येतात.
संदर्भ
१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
७. https://palghar.gov.in/tourism/
- ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, शनिवार दिनांक ६ जुलै २०२४