Jump to content

रामसेतू

रामसेतु ,तमिळनाडू, भारतच्या दक्षिण पूर्व समुद्र किनारी रामेश्वरम बेट तथा श्रीलंकेच्या उत्तर पश्चिमी समुद्र किनाऱ्यावर मन्नार बेटाच्या मध्ये चूनखडकाने बांधलेली एक सेतू आहे. भौगोलिक रचणे नुसार लक्षात येते कि काही काळापूर्वी या सेतूमुळे भारत आणि श्रीलंका यांना जोडणारा हा एक दुवा होता.[1] हा सेतू ३० किलोमीटर (१८ मैल) लांबीचा आहे.[2] तसेच मन्नार खाड़ी (दक्षिण पश्चिम)ला पाक जलडमरूमध्य (उत्तर पूर्व) पासून विभागले आहे. काही वाळूचे किनारे सुके आहेत. या भागात समुद्र काही ठिकाणी उथळ (कमी खोलीचा) आहे. काही ठिकाणी तर अवघ्या ३ फुट ते ३० फुट (१ मीटर ते १० मीटर) आहे ज्यामुळे दिशा दर्शकाला अडथळा होतो! सांगितले जाते कि १५ व्या शतकापर्यंत हे पायी जाण्यायोग्य होते! मात्र तुफानामुळे ते खोल झाल्याने आता हे शक्य नाही! मंदिरातील काही कागदपत्रानुसार रामसेतू संपूर्णपणे समुद्राच्या पाण्यावर होता! मात्र ईस पूर्वी 1480 मध्ये एका चक्रीवादळाने ते उध्वस्त झाले!
रामायण या हिंदू ग्रंथानुसार, हिंदू देवता व अयोध्येचा राजपुत्र राम यांच्या सैन्याने दानवांचा राजा रावण यांचेशी युद्धावेळी हा सेतूची निर्मिती केल्याची कथा आहे.

"रामसेतूवरील दगड आणि वाळू यांचं परीक्षण करण्यात आलं आहे. पूल बांधण्यासाठी आवश्यक असणारे दगड बाहेरून आणण्यात आले होते. तसंच 30 मैलांपेक्षा अधिक लांबीचा हा पूल मानवनिर्मित आहे," भूगर्भशास्त्रज्ञ आणि पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते, राम सेतू पुलाचे खडक 7000 वर्षांहून जुने आहेत, तर वाळूचे पट्टे सुमारे 4,000 वर्षे जुने आहेत. आता रामजन्म तिथीचा विचार केला तर भगवान रामाचा जन्म 10 जानेवारी, 5114 ईसापूर्व 12.05 वाजता झाला, तर शेकडो वर्षांपासून चैत्र महिन्याची नवमी (मार्च) राम नवमी म्हणून साजरी केली जात आहे.

आणखी एका छंदानुसार, तारांगण सॉफ्टवेअरनुसार, वाल्मिकींनी सांगितलेल्या ग्रह नक्षत्रांच्या आधारे, रामाची जन्मतारीख 4 डिसेंबर 7323 ईसापूर्व होती, म्हणजेच आजपासून 9339 वर्षांपूर्वी. राम जन्मावर अनेक संशोधने झाली आहेत पण सर्वात अचूक संशोधन प्रोफेसर टोबियास यांनी केले आहे. वाल्मिकींच्या मते, श्रीरामांचा जन्म चैत्र शुक्ल नवमी तिथी आणि पुनर्वसु नक्षत्र या दिवशी झाला जेव्हा पाच ग्रह त्यांच्या उच्च स्थानावर होते. अशा प्रकारे सूर्य मेष राशीमध्ये 10 अंशांवर, मंगळ राशीमध्ये 28 अंशांवर, गुरू कर्क राशीमध्ये 5 अंशांवर, शुक्र मीनमध्ये 27 अंशांवर आणि शनि तूळ राशीमध्ये 20 अंशांवर होता. (बाल कांड 18/श्लोक 8, 9).

संशोधक डॉ. वर्तक पी.व्ही. वर्तक यांच्या मते, अशी परिस्थिती इसवी सन पूर्व ७३२३ डिसेंबरमध्येच निर्माण झाली होती, परंतु प्रोफेसर टोबियास यांच्या मते, ग्रहांच्या कॉन्फिगरेशनच्या आधारे, जन्म १० जानेवारी, ५११४ ईसापूर्व झाला. त्यांच्या मते तेव्हाही अशी खगोलीय स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर 12.25 मिनिटांनी आकाशात असेच दृश्य होते ज्याचे वर्णन वाल्मिकी रामायणात आहे.प्रोफेसर टोबियास यांच्या संशोधनाशी बहुतेक संशोधक सहमत आहेत. याचा अर्थ असा की रामाचा जन्म 10 जानेवारी 12:25 वाजता 5114 ईसा पूर्व मध्ये झाला. आता रामजन्माची तारीख आणि रामसेतु बांधण्यासाठी आणलेले पुलाचे खडक यांचे वर्षामध्ये जवळ जवळ साम्य दिसुन येते यावरून तरी हेच प्रमाणित होते की रामसेतु ज्याला सध्या अँडम ब्रिज असे संबोधतात तो भगवान श्रीराम यांनीच बांधलेला आहे आणि त्याला रामसेतु म्हणुनच संबोधले गेले पाहिजे अँडम ब्रिज नाही.