Jump to content

रामराम

रामराम हे अभिवादनाचे शब्द आहेत, जे लोक अभिवादन करण्यासाठी वापरतात. भारतात बऱ्याच ठिकाणी लोक एकमेकांना भेटल्यावर किंवा निरोप देताना "राम राम" असे शब्द उच्चारतात. महाराष्ट्रात या परंपरेला "रामराम घालणे" असे म्हणतात.

राम हा विष्णूचा सातवा अवतार आहे. रामाचे नाव घेतल्याने मोक्षप्राप्ती होते, असे मानले जाते. नमस्काराच्या निमित्ताने देवाचे नामस्मरण होईल, या श्रद्धेने प्राचीन काळापासून ही "रामराम घालण्याची" परंपरा चालू आहे.

मनोरंजक दावा

असाही प्रश्न काही लोक विचारला जातो की रामराम दोनच वेळा का बोलतात? एकदा किंवा तीनदा का नाही? दोनदा ‘राम राम’ म्हणण्यामागे एक मोठं रहस्य आहे असे काही लोक म्हणतात.

राम हा शब्द इंग्रजीत "RAM" असे लिहतात. हिंदी वर्णमालेत 'आर' सत्ताविसावे, 'ए' दुसरे आणि 'म' हा पंचविसावे अक्षर आहे. तिन्ही अंकांची बेरीज २७ + २ + २५ = ५४ येते. म्हणजे एका 'राम'ची बेरीज ५४ आहे, त्याचप्रमाणे दोन 'राम राम'ची बेरीज १०८ होईल. १०८ हा हिंदू धर्मात पवित्र आकडा आहे. नामजप करतानाही १०८ मणी मोजतात. त्यामुळे "रामराम" मागे हे कारण आहे, असा मनोरंजक दावा इंटरनेट आणि समाजमाध्यमांवर केला जातो.

इतर अभिवादने

रामराम प्रमाणे भारताच्या विविध भागात अभिवादन करताना इतर काही देवांची नावे घेण्याची परंपरा आहे. असे असले तरी शक्यतो राम किंवा कृष्ण यांचीच नावे भारतभर घेतली जातात.

इतर पद्धतींमध्ये पुढीलप्रमाणे नावे घेतात:

  • राम राम
  • राधे राधे
  • जय श्रीकृष्ण
  • नमस्ते
  • अस्सलमु अलैकुम
  • सत श्री अकाल
  • प्रणाम
  • नमस्कार
  • शुभ सकाळ/शुभ दुपार/शुभ संध्याकाळ