रामबन (जम्मू आणि काश्मीर)
रामबन हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील रामबन जिल्ह्यातील एक शहर आहे, हे जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.
हे शहर चिनाब नदीच्या काठी वसलेले आहे.
रामबन राष्ट्रीय महामार्ग ४४ वर जम्मू पासून सुमारे १२ किमी आणि श्रीनगरपासून १३० किमी वर आहे. [१]
रामबनची सरासरी उंची ७४७ मीटर आहे.
वस्तीविभागणी
२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार[२] येथील लोकसंख्या ३,५९६ होती. यांपैकी १,८७३ पुरुष आणि १,७२३ महिला होत्या. येथील साक्षरतादर ८२.२३% होता.[३]
संदर्भ
- ^ Statement showing the number of blocks in respect of 22 Districts of Jammu and Kashmir State including newly Created Districts Archived 2008-09-10 at the Wayback Machine. dated 2008-03-13, accessed 2008-08-30
- ^ "Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. 2004-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-11-01 रोजी पाहिले.
- ^ "Ramban City Population Census 2011 - Jammu and Kashmir". www.census2011.co.in. 2017-01-18 रोजी पाहिले.