Jump to content

रामचंद्र चिंतामणी केतकर

तात्यासाहेब केतकर
मूळ नावरामचंद्र चिंतामणी केतकर
जन्मजानेवारी १८८५
निर्वाणएप्रिल १९६७
संप्रदायसमर्थ संप्रदाय
गुरूश्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
भाषामराठी
संबंधित तीर्थक्षेत्रेगोंदवले
वडीलभाऊसाहेब केतकर
पत्नीयमुनाबाई

तात्यासाहेब केतकर : (रामचंद्र चिंतामणी केतकर) ( जानेवारी १८८५ - निधन: एप्रिल १९६७)
श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे थोर शिष्य. भाऊसाहेब केतकर यांचे चिंरजीव. श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी यांच्या माध्यमातून हजारो लोकांना नामाला लावले.


तात्यासाहेबांना श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रथम भेट गोंदवले येथे फेब्रुवारी १९०४ मध्ये झाली. ९ मार्च १९०४ रोजी त्यांचा विवाह गोंदवल्यासच श्रीमहाराजांच्या उपस्थितीत झाला. श्रीमहाराजांनी तात्यासाहेब व सौ. यमुनाबाई या उभयता पतिपत्नींकडून तेरा कोटी जपाचा संकल्प सोडवून घेतला. दोघांनी मिळून तेरा कोटी जप पूर्ण करावा अशी श्रीमहाराजांनी सांगितले. तात्यासाहेबांना मिलिटरी अकांऊटसमध्ये सन १९१७ मध्ये नोकरी मिळाली. २ मार्च १९४८ रोजी ते सेवानिवृत्त झाले.

तात्यासाहेब गृहस्थाश्रमी असले तरी त्यांचा प्रपंच एखाद्या योग्यालाही लाजवेल असा होता. भाऊसाहेबांप्रमाणे तात्यासाहेबही आपला प्रपंच मनाने श्रीसद्गुरूंच्या चरणी अर्पण करून त्यातून मुक्त झाले होते. त्यांच्या पत्नी यमुनाबाई यांची पारमार्थिक योग्यताही मोठी होती. तात्यासाहेबांनी लिहिलेले आत्मचरित्र 'पू. तात्यासाहेब केतकर यांचे आत्मवृत्त' या नावाने प्रसिद्ध करण्यात आले आहे.

'पू. तात्यासाहेब केतकर यांचे आत्मवृत्त'