Jump to content

रामचंद्र चिंतामण ढेरे

रामचंद्र चिंतामण ढेरे


रामचंद्र चिंतामण ढेरे (जन्म : निगडे-पुणे जिल्हा, २१ जुलै[], इ.स. १९३० - पुणे, १ जुलै, इ.स. २०१६) हे मराठी इतिहास-संशोधक व लेखक होते. ढेरे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील निगडे या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव चिंतामण गंगाधर ढेरे, आईचे शारदा आणि पत्‍नीचे इंदुबाला असे होते. त्यांना डॉ. अरुणा ढेरे आणि वर्षा गजेंद्रगडकर अशा दोन कन्या आणि मिलिंद ढेरे नावाचा छायाचित्रकार मुलगा आहे.

रा. चिं. ढेरे आणि इंदुबाला यांचा १९५५ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्या दोघांनी ६१ वर्षे संसार केला होता. रा.चिं ढेरे यांचे निधन १ जुलै २०१६ रोजी झाले तर इंदुबाला ढेरे १७ जानेवारी २०१७ला देवाघरी गेल्या

कार्य

प्राच्यविद्या संशोधन केंद्रात त्यांनी अभ्यासक म्हणून काम केले. त्यांनी प्राच्यविद्या संशोधनामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्र संस्कृतीच्या अनेक अस्पर्शित पैलूंवर प्रकाश टाकण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयांत त्यांचा विशेष अभ्यास असून त्यांनी या विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांनी एकूण १०५ पुस्तके लिहिली आहेत. संस्कृती, साहित्य, लोकविद्या या क्षेत्रात यांनी खास कार्य केले असे म्हणता येते. त्यांची नाथसंप्रदायाचा इतिहास, दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा, शक्तिपीठांचा शोध, चक्रपाणि, शोधशिल्प, लज्जागौरी, श्रीतुळजाभवानी, श्रीविठ्ठल एक महासमन्वय, "त्रिविधा', श्रीपर्वताच्या छायेत आणि इतर पायाभूत महत्त्वाचे ग्रंथ, अनेक विचारपूर्ण संशोधनात्मक लेख हे जगभरच्या संशोधनक्षेत्रात महत्त्वाचे आहेत. इतिहासाचे लेखन म्हणजे केवळ कागदपत्रांचे पुरावे सादर करणे नव्हे, कागदपत्रांमधील माहितीचे सत्य तपासताना समकालीन कागदपत्रातील संदर्भही ताडून पाहणे आवश्यक अशी त्यांची भूमिका होती.

लहानपण

ढेरे यांचे बालपण व उमेदवारीचा काळ विपरीत परिस्थितीत गेला. वयाच्या पाचव्या वर्षी आई वडील वारले. शिक्षक, मुद्रित शोधक, ग्रंथपाल इत्यादी कामे उपजीविकेसाठी ते करीत. शंकराजी नारायण पारितोषिकासाठी ढेरे यांनी नाथसंप्रदायावर संशोधनपर लिखाण केले होते. त्यांनी संशोधनाने सिद्ध केलेला ‘चक्रपाणी’ हा प्रबंध सादर केला. तोही एम.ए. न होता थेट पीएच.डी. साठी. अपवाद म्हणून हा प्रबंध स्वीकारण्यात आला होता. 'षट्स्थल एक अध्ययन' या संशोधनपर प्रबंधासाठी पुणे विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी प्राप्त झाली.[]

संग्रह

रा. चिं ढेरे यांनी त्यांच्याकडील साहित्याच्या प्रेमापोटी जमा केलेला पुस्तकांचा संग्रह एखाद्या संशोधन संस्थेप्रमाणे ट्रस्टच्या माध्यमातून समाजासाठी खुला केला आहे. त्यांच्या संग्रहामध्ये इतिहास, संत साहित्य, जुने मराठी वाङ्मय, लोकसाहित्य, लोकसंस्कृती अशा वेगवेगळ्या विषयांवरील साहित्य आहे. मराठी संस्कृतीचा अभ्यास व संशोधन करणाऱ्या संशोधकांसाठी ही पुस्तके महत्त्वाची आहेत.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अमृतकन्या
श्री आनंदयात्री
आज्ञापत्रसंपादितपद्मगंधा प्रकाशन१९६०
इंद्रायणी९ लेखांचा संग्रह
एका जनार्दनीपैठणची माहितीपुस्तिका
कथापंचक
करवीरनिवासी श्री महालक्ष्मी
कल्पद्रुमाचे तळी
कल्पवेल
गंगाजल
श्री गुरूंचे गंधर्वपूरगाणगापूरची माहितीपुस्तिका
श्री गुरुदेव दत्तऔदुंबर-नरसोबाची वाडी यांचे माहितीपुस्तक
श्रीगोदे भवताप हरीनासिक-त्र्यंबकेश्वर माहितीपुस्तिका
महात्मा चक्रधरबालवाङ्मय
चित्रप्रभा
जागृत जगन्‍नाथजगन्‍नाथपुरीची माहितीपुस्तिका
तुका झाले कळसदेहूची माहितीपुस्तिका
श्रीतुळजाभवानीधार्मिकपद्मगंधा प्रकाशन
तेजस्वी धर्मोद्धारकआदि शंकरार्यांचे ्लघुचरित्र
त्रिभुवनेश्वर लिंगराजभुवनेश्वरचे माहितीपुस्तक
त्रिविधापद्मगंधा प्रकाशन
दत्त संप्रदायाचा इतिहास
दलितांचा कैवारी भार्गवरामपरशुरामक्षेत्राची माहितीपुस्तिका
दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा
नागेशं दारुकावनेऔंढा नागनाथची माहितीपुस्तिका
नाथ संप्रदायाचा इतिहास
श्रीनाथलीलामृतधार्मिककेशव भिकाजी ढवळे
नामदेव : एक विजययात्रा
नामयाची जनी
श्री नृसिंह सरस्वती
श्री पर्वतीच्या छायेतपद्मगंधा प्रकाशन
पुण्याई
प्रवासी पंडितह्यू एन त्संगच्या प्रवासाची माहिती
प्राचीन मराठीच्या लोकधारा
प्राचीन मराठी वाङ्मय : शोध आणि संहिता
बारावे ज्योतिर्लिंगघृष्णेश्वराची माहितीपुस्तिका
बोरकरांची प्रेमकवितासंपादित
भक्तिवेडी बहिणा
भारतीय रंगभूमीच्या शोधात
मंगलमूर्ती मोरयाचिंचवड-मोरगावची माहितीपुस्तिका
महाकवीची बखरसंपादित१९७३
महामायासहलेखिका-तारा भवाळकर
महाराष्ट्राचा गाभारा
श्रीमहालक्ष्मी
मातापुत्राची जगन्मातादेवीच्या साडेतीन पीठांची माहितीपुस्तिका
मानसयात्रा
मामदेव, जनी आणि नागरीपद्मगंधा प्रकाशन
मार्तंडविजयसंपादित१९७५
मुक्तिगाथा महामानवाची
मुसलमान मराठी संतकवी
रामराज्याची स्फूर्तिकेंद्रे
रुक्मिणी स्वयंवरसंपादित१९६५
योगेश्वरीचे माहेरअंबाजोगाईची माहितीपुस्तिका
लज्जागौरी (ग्रंथ)पद्मगंधा प्रकाशन
लोकदेवतांचे विश्व
लोकसंस्कृतीचे उपासकपद्मगंधा प्रकाशन
लोकसंस्कृतीचे विश्व
लोकसाहित्य : शोध आणि समीक्षा
लौकिक आणि अलौकिक
सरदार वल्लभभाई
श्रीविठ्ठल : एक महासमन्वयधार्मिक
विराग आणि अनुराग
विविधा
श्रीव्यंकटेश्वर श्री कालहस्तीश्वरपद्मगंधा प्रकाशन
श्री शारदामाता
शिखर शिंगणापूरचा श्री शंभू महादेव
शिव-दिग्विजयसंपादित१९७५
शोधशिल्प
श्रीकृष्ण चरित्रसंपादित१९७२
संत, लोक आणि अभिजनधार्मिकपद्मगंधा प्रकाशन
संतांच्या आत्मकथा
संतांच्या चरित्रकथा
सुभद्रा स्वयंवरसंपादित१९६७
श्री स्वामी समर्थधार्मिक, बखरअनमोल प्रकाशन
ही चिरंतनाची वाट
क्षिप्रेच्या सोनेरी आठवणीउज्जयिनीची माहितीपुस्तिका
ज्ञानोबा माऊलीआळंदीची माहितीपुस्तिका

पुरस्कार

संदर्भ

  1. ^ डॉ. अजय दांडेकर. "अविरत शोधयात्री". 2012-11-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ जुलै, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र चिंतामण ढेरे यांचे निधन". www.evivek.com. 2017-02-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-08 रोजी पाहिले.

बाह्य दुवे