राम शब्दामधील संज्ञासूत्रे
1. अर्थवदधातुरप्रत्ययःप्रातिपदिकम्-
धातुं प्रत्ययं प्रत्ययान्तंच वर्जयित्वा अर्थवद शब्दस्वरुपं प्रातिपदिकसंज्ञं स्यात ।
जो धातु म्हणजे क्रियापद नाही .प्रत्यय नाही, किंवा प्रत्ययान्त शब्द नाही पण ज्याला अर्थ आहे अशा अर्थपूर्ण शब्दाला प्रातिपदिक म्हणतात .ज्या शब्दाततून मूर्त अमूर्त कोणत्यातरी गोष्टीचा बोध होतो त्या शब्दाला प्रातिपदिक असे म्हणतात . प्रत्ययग्रहणे तदन्तग्रहणम्। या परिभाषेनुसार प्रत्यय शब्दातून प्रत्ययान्ताचे पण ग्रहण होते.
2. कूत्तदधितसमाश्च।
कूत्तद्धितान्तौ समासाश्च तथा स्युः।
कूत प्रत्ययान्त शब्द तद्धित प्रत्ययान्त शब्द व सामासिक शब्द यांनाही प्रातिपदिक संज्ञा होते. हे तीनही शब्द अर्थपूर्ण असतातच. कदन्त - कत ,तद्धितान्त - राघव, सामासिक शब्द - राजपुरुष .
3.सुपः -
सुपस्त्रीणि त्रीणि वचनानि एकशः एकवचन - द्विवचन - बहुवचन - संज्ञानी स्युः।
हे संज्ञासूत्र आहे. सु औ जस्....।या 21 प्रत्ययाचे तीन तीन प्रत्यय विभागल्यास एक त्रिकूट तयार होते. त्यातील पहिला प्रत्यय एकवचनाचा, दुसरा द्विवचनाचा ,तिसरा बहुवचनांचा असल्यामुळे त्यांना तीच नावे दिली आहेत .या त्रिकूटाला अनुक्रमे प्रथमा ,द्वितीया, ततीया नावे आहेत.
या प्रत्ययांना अनुबंध जोडलेले आहेत काही जास्तीचे स्वर, व्यजने, जोडली आहेत. ती सर्व वेगवेगळ्या सूत्राने इत संज्ञक होतात व तस्य लोपः नेहमी त्याचा लोप होतो .प्रारंभीच्या सु पासून अंतिम सुप् मधील प् पर्यत सुप् असा प्रत्यहार केला आहे.
4. बहुषु बहुवचनम्।
बहुत्वविवक्षायां बहुवचनं स्यात्।
बहुत्वाची अपेक्षा असेल तर बहुवचनी लावावे. बहु म्हणजे दोनपेक्ष्या अधिक सरूप शब्द असतील तर शब्द एकच राहील ,पण प्रत्यय बहुवचनी लावल्यास अनेक वस्तुचा बोध होतो.
5. विभक्तिश्च ।
सुप् तिङौ विभक्तिसंज्ञौ स्तः।
विभक्ति संज्ञा सांगणारे हे सूत्र आहे .सुप प्रत्यय व तिङ् प्रत्यय त्यांना विभक्ति संज्ञा प्राप्त होते .सुप म्हणजे प्रातिपदिकांना लागणारे 21 प्रत्यय .व तिङ् म्हणजे धातूना लागणारे कालवाचक 19 प्रत्यय होत. या सर्वाना विभक्ति संज्ञा होते.
6. चुटू।
प्रत्ययदौ चुटू इतौ स्तः।
प्रत्ययाच्या आरंभीच वर्ग व ट वर्ग असतील तर त्याला इत संज्ञा होते ज्याला इत संज्ञा होते त्याचा नेहमी तस्य लोपः लोप होतो जस् प्रत्ययातील ज्ला इत संज्ञा होईल व लोप होईल त्यामुळे अस् प्रत्यय लागेल.
7. यस्मात् प्रत्ययविधिः तदादि प्रत्यये अङ्गम ।
यः प्रत्ययः यस्मात् क्रियते तदादि शब्दस्वरुपं तस्मिन् अङगं स्यात्।
जो प्रत्यय ज्यावरून केला जातो त्या प्रत्यया करीता ते शब्दाचे आदिस्वरूप 'अङग' संज्ञा प्राप्त करते. प्रकूतिस्वरूप शब्दावरून प्रत्यय केला जातो तेव्हा प्रकूतिवाचक शब्दाला अंग असे म्हणतात. उदा- भू+ शप् + तिप् = भू+ अ +तिप्
इथे भूअ हे तिप् प्रत्ययाकरीता अंग आहे.
8. आमि पूर्वः
अकोअम्याचि पूर्वरुपमेकादेशः
जर अ,इ,उ,ऋ,ल ह्या स्वरापुढे अम् प्रत्ययाचा स्वर आला तर एकादेश करावा .पूर्व आणि पर दोन्ही स्वराचे जागी पूर्वस्वर ठेवावा. उदा- राम +अम् - स्वौजस....।
रामम् .. आमि पूर्वः।