राम शब्दामधील विधीसूत्र
1) स्वौ जसमौट-छष्टाभ्याम्-भिस्-ङे-भ्याम् -भ्यस् -ङसि-भ्याम् -भ्यस् -ङसोसाम् -ङयोस् -सुप्
वरिल सर्व प्रत्यय विभक्ती मधील शब्दाला एकवचन व्दिवचन बहुवचनात लागतात.
2) सरूपाणामेकशेष एकविभक्तौ
एकविभक्तौ यानि सरूपाण्येव दृष्टानि तेषामेक एव शिष्यते
एका विभक्तित सारख्या दिसणाऱ्या शब्दापैकी एक शब्द शेष राहतो. बाकी शब्दांचा लोप होतो.
3) प्रथमयो : पूर्वसवर्ण :
अकः प्रथमाव्दितीययोरचि पूर्वसवर्णदीर्घ एकादेश: स्यात्
अक् प्रत्याहारत प्रथमा आणि व्दितीया विभक्तित समोर अच् असताना पूर्व आणि नंतरच्या स्थानावर पूर्व सवर्ण दीर्घ एकादेश होतो.
उदा. राम + अस् = रामास्
4) तस्माच्छसो नः पुंसि
पूर्व सवर्णदीर्घात्परो यः शसः सःस्तस्य नः स्यात पुंसि
पूर्वसवर्णदीर्घानंतर शस् यातील सकार स्थानावर नकार आदेश होतो.
5) नादिचि
आदिचि न पूर्व सवर्ण दीर्घ :
जर अवर्णासमोर इच् प्रत्याहार असेल तर तो पूर्वसवर्ण दीर्घ होणार नाही.
6) अमि पूर्व :
अकःअम्यचि पूर्व रूप एकादेश स्यात
अक प्रत्याहार पहले असेल व अम नंतर असेल तर पूर्व रूप एकादेश होतो.
उदा. रामम्/रामौ